खालापूर प्रेस क्लबच्या पुढाकारातून स्पंदन हॉस्पिटलमध्ये पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा 3 डिसेंबर रोजी 83 वा वर्धापन दिन राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा करण्यात आला असता त्याचे औचित्य साधून खालापूर प्रेस क्लबने खोपोली येथील स्पंदन हॉस्पिटलचे डॉ.प्रसाद पाटील यांच्या सहकार्याने पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी खोपोली खालापुर तालुक्यातील जवळपास 35 हुन अधिक पत्रकारांनी सहभाग घेऊन तपासण्या करून घेतल्या, त्यामुळे बऱ्याच कालावधी नंतर सर्वच पत्रकार एकत्र आल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली.
मराठी पत्रकार परिषदेची स्थापना दिन हा महाराष्ट्रात 3 डिसेंबर रोजी साजरा होत असल्याने मुख्य विस्वस्त रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात पत्रकार बंधुची आरोग्य तपासणी होत आहे. त्यामुळे खालापूर प्रेस क्लब ने ही पुढाकार घेत खोपोली खालापुरातील पत्रकार बंधूची आरोग्य तपासणी शिबीर खोपोली मधील स्पंदन हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ, गोकुलदास येशिकर, प्रशांत गोपाळे, बाबू पोटे, अमोल पाटील, जयवंत माडपे, अरुण नलावडे, प्रवीण जाधव, अनिल वाघमारे, अंकुश मोरे, दिलीप पवार, मेहबूब जमादार, एस.टी.पाटील, संदीप ओव्हाळ, दिनेश पाटील, रवी मोरे, समाधान दिसले, हनुमान मोरे, संतोषी म्हात्रे, सारिका सावंत, अर्जुन कदम, आकाश जाधव, तय्यब खान, नवज्योत पिंगले, संतोष गोतारने, किशोर साळुंखे, योगेश वाघमारे, शेखर परब, प्रसाद अटक, शिवाजी जाधव यांच्यासह आदी पत्रकार उपथीत होते. तर यावेळी पत्रकारांची वजन उंची, ब्लड प्रेशर, रक्ताच्या सर्व तपासण्या ई.सी.जी.सह पूर्ण शरीर तपासणी मशिनव्दारे करण्यात आली. यावेळी डॉ.प्रसाद पाटील व त्याच्या सहकारी श्रद्धा जंगम, पूजा वाघमारे, सुगंधा चिवटे, शोभा सणस, जिनिफर भोपतराव आदी कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेऊन तपासण्या केल्या. त्यामुळे खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे..
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे, संकट काळात जीवावर उधार होऊन समाजाच्या बातम्यांच्या माध्यमातून सतत माहिती देत असतो. नुकताच कोरोना काळात जीवाची पर्वा न करता समाजाला घडणाऱ्या घडामोडींची माहिती देण्याचे काम केले, त्यामुळे या पत्रकार मंडळांची आरोग्य तपासणी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्याचा योग्य आला आणि माझ्या स्पंदन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या यंत्र सामुग्रीच्या साह्याने तपासणी करण्याचे भाग्य मिळाले.
डॉ.प्रसाद पाटील (स्पंदन हॉस्पिटल खोपोली)
पत्रकार हा प्रत्येक प्रसंगात समाजच्या मदतीसाठी धावत असतो.
पत्रकार हा प्रत्येक प्रसंगात समाजच्या मदतीसाठी धावत असताना त्यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांवर संकट ओडावल्याचे मागील काळात घटना घडल्या. त्यामुळे आमचे मार्गदर्शक एस.एम.देशमुख यांच्या आदेशाने परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून खोपोली खालापूर तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी स्पंदन हॉस्पिटल मध्ये घेण्यात आली, त्याला पत्रकारांनी ही उपस्थित राहून सहकार्य केले