विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल महापालिकेच्या टॅक्स संदर्भात विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी लवकरच टॅक्सवर चर्चा करून पुढे काय करायचं आहे ते ठरवू असे अजितदादा पवार यांनी सांगितले. त्यामुळे पनवेलच्या नागरिकांना करातून सवलत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता करासंदर्भात आज सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.मा.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत ना.मा अजितदादा पवार यांनी महाविकास आघाडीच्या ७०% करात सूटच्या मागणीला सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या दुटप्पी धोरणाचा फटका येथील नागरिकांना बसणार आहे. कराची रक्कम कमी करावी अशी मागणी विरोधी पक्षाची आहे. मात्र सत्ताधारी याला जुमानत नाहीत. एलबीटी कर माफ केला जातो, मात्र करामध्ये नागरिकांना अधिकची सवलत दिली जात नाही. यासाठी विरोधी पक्षाने वेळोवेळी चर्चा व आंदोलने केली. या सार्यांची माहिती प्रितम म्हात्रे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिली. यावेळी अजित दादा पवार यांनी मंत्री जयंत पाटील, आदीती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार बाळाराम पाटील यांच्यासोबत चर्चा करून पुढे काय करायचे आहे ते ठरवणार असल्याचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांना सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक गणेश कडू व इतर उपस्थित होते.
या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रशांत पाटील, विरोधी पक्ष नेता प्रितम म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे सुदाम पाटील, शिवदास कांबळे तसेच पनवेल-उरण महाविकास आघाडीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
पालिकेने करामध्ये आणखी सूट द्यावी यासाठी आम्ही वेळोवेळी चर्चा व आंदोलने केली. आज आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सर्व माहिती दिली आहे. त्यांनी 70 टक्के करात सूटच्या मागणीला सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.- प्रितम म्हात्रे, विरोधी पक्ष नेता, पनवेल महानगरपालिका
--