रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्षला जोर का झटका.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : सुनिल पाटील :

रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील शेलघर गावात रायगडचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत याने बांधलेले घर, त्या शेजारील चाळ आणि हाॅटेल (बार) हे सर्व सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेले असल्याची लेखी कबुली गव्हाण ग्रामपंचायतीने दिली असून, त्या मुळे सर्वत्र रायगड काँग्रेसची नाचक्की होत आहे.

महाराष्ट्रात सत्तेत आल्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या डोक्यात हवा गेली असल्याचेच हे निदर्शक आहे. सिडकोच्या जागा ही सार्वजनिक व शासकीय मालमत्ता आहे. तिथे एखाद्या सामान्य माणसाने गरजेपोटी निवाऱ्यासाठी एखादे घर बांधकाम केले तर एकवेळ समजून घेता येईल. पण अशा माणसावर सिडकोचे हरामखोर आणि भ्रष्ट अधिकारी लगेच कारवाई करायला धावतात. कायदा दाखवून गरीब सामान्य जनतेला छळतात. मात्र महेंद्र घरतसारख्या धनदांडग्याला एक नोटीस पाठवायलाही यांची हातभर फाटते. यांचा रूबाब आणि माज फक्त सामान्य नागरिकाला छळण्यासाठीच असतो हेच या प्रकरणातून सिद्ध झाले आहे.

गव्हाण ग्रामपंचायतीने आम्हाला लेखी पत्राद्वारे दिलेल्या पत्रावरून महेंद्र घरत याने सिडकोच्या शासकीय जागा बळकावून तिथे स्वतःचे घर बांधून, आणखी त्याच्या बाजूला चाळी व बेकायदेशीर बार बांधून पैसा कमावण्याचा सपाटा लावला आहे हेच लक्षात येत आहे. *या सर्व बेकायदेशीर बांधकामाची अधिकृत नोंद त्यांच्या असेसमेंटवर करावी व सिडको तसेच पोलीसांना याबाबत कळवावे यासाठी आम्ही आता गव्हाण ग्रामपंचायतीमधे पाठपुरावा सुरू केला आहे.* लवकरच हे काम संबंधित ग्रामसेवक करतील ही आम्हाला आता खात्री झाली आहे.

संपूर्ण रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना शरम वाटावी असा हा प्रकार असून, पक्षाने अशा माणसाला पाठीशी घालून दाखवून दिले आहे की महात्मा गांधींच्या तत्वांशी त्यांना काही देणेघेणे उरलेले नाही. हे खोटे असेल आणि या प्रकाराची एक टक्काही लाजलज्जा रायगड काँग्रेसला असेल तर त्यांनी महेंद्र घरतला रामराम करून दुसरा माणूस अध्यक्ष म्हणून निवडा....हवंतर आयात करा... पण हा कलंक ठेवू नका.

आता, ग्रामपंचायतीच्या या पत्राच्या आधारे सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित बांधकामावर निष्कासनाची कारवाई व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा सुरू करीत आहोत. या कामात सिडकोचे अधिकारी चालढकल करीत असल्याचे चित्र असून, त्याबद्दल त्यांना लवकरच उत्तर द्यावे लागणार आहे हे निश्चित. 



Post a Comment

Previous Post Next Post