प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
आपल्या गावाचा विकास करण्याकरीता भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय उरलेले नाही, असे प्रतिपादन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मंगळवारी विकास कामांच्या शुभारंभावेळी केले. कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मतदार संघाचा सर्वांगिण विकास होत आहे. त्यानुसार त्यांच्या आमदार निधीतून व व २५:१५ या मुलभूत विकास योजनेतून करण्यात येणार्या कामांचे भुमीपूजन व उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते हस्ते मंगळवारी झाले.
पनवेल तालुक्यात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे तालुक्यात सुरु आहेत. त्याअंतर्गत ८ लाख रुपयांच्या शिवसनई ते दुर्गा देवी मंदिर पर्यत्तच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे, १० लाख रुपयांच्या चिंचवली ते भानघर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे आमदार निधीतून तसेच मुलभूत विकास येजनेच्या २० लाख निधीतून वाकडी ते दुंदरे रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भुमीपूजन तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच १६ लाख रुपयांचा आमदार निधी वापरून मोर्बे येथील एकनाथ नावडेकर यांच्या घरापासून ते मराठी शाळेपर्यत्त तयार करण्यात आलेल्या कॉंक्रिटच्या रस्त्याचे उद्घाटनही या वेळी अरुणशेठ भगत यांच्याहस्ते झाले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजपनेते एकनाथ देशेकर, पनवेल पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, आनंद ढवळे, प्रकाश खैरे, नामदेव जमदाडे, शिवाजी दुर्गे, सरपंच. अनुराधा विष्णू वाघमारे. उपसरपंच. मंगला गणेश उसाटकर, माजी सरपंच नरेश पाटील, रमेश पाटील, दिनेश फडके, बाळाराम उसाटकर, रामदास फडके,रमेश सिताराम पाटील. शांताराम चौधरी. किशोर पाटील. नारायण चौधरी. शत्रुघ्न उसाटकर . विठ्ठल पाटील. भीमा रामा गोसावी. बालाराम पालांडे. शंकर पवार. विष्णू चौधरी, ग्रामपंचायर सदस्य रमेश नावडेकर, एकनाथ नाईक, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.