मन्नापूरम फाईनेंसने कर्जाच्या नियम व अटीबाबत सविस्तर माहिती ग्राहकांना दिली पाहिजे.

 नियम अटी पूर्ण वाचून व समजाऊन सांगितले पाहिजे.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

मी नजिरुद्दिन आयनुद्दिन मुलाणी,

 राहणार पुणे शहर उरुळी देवाची.

 मी आपणास सर्व जनते समोर एक महतत्वपूर्ण बाब मांडत आहे. ज्याचा मला स्वतःला अनुभव आला आहे , ती बाब अशी की  मी  मन्नापुरम गोल्ड फाईनेंसशी कोंढवा शाखा येथे  213000/ - रू. कर्ज घेतलं होतं आणि त्याचे व्याज  दर 0.7% अर्थात् एका महिन्याचा 1500/- रुपय इतका होतो , परंतु केवळ 3 दिवस   व्याज भरण्यास उशीर झाल्याने मन्नापूरम फाईनेंसने माझ्या कडून 1.5%  प्रमाणे वाढीव व्याज   म्हणजे-च 3580/-रुपये इतके भरण्यास भाग पाडले.

 सोन गहाण ठेऊन व्याजावर  रक्कम काढताना आम्ही घाई गडबडीत गरजू व्यक्ती त्यांचे फॉर्म भरून देताना नियम अटी पूर्ण वाचत नाही आणि त्याचाच हे लोग असा फायदा घेतात आणि त्यांच्या म्हणण्या प्रमाणे आम्ही तर तुम्हाला अगोदर पासूनच सगळ  कागद पत्रावर लिहून पूर्ण तुम्हाला दिल होत आणि त्यावर आपण सही सुद्धा केली आहे . माझं मत असे आहे की मन्नापूरम फाईनेंस ने आपल्या सर्व शाखां मध्ये संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांना हे बंधनकारक केलं पाहिजे की जो ग्राहक आपल्याशी कर्ज घ्यायला येतो त्याला सर्व नियम अटी  पूर्ण वाचून व समजाऊन सांगितले पाहिजे.


      

Post a Comment

Previous Post Next Post