राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख :
पुणे : माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या कारचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने त्यातील एक लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर अज्ञात चोरट्याने चोरुन नेले.यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.पुणे कॅणटोंमेंट विधानसभा मतदार संघाचे बागवे हे माजी आमदार आहेत .अगदी थोड्या मतांनी गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला मात्र या मतदार संघासह पुण्यात कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातही मातंग समाजाचे वरिष्ठ नेते म्हणून ते परिचित आहेत .
याप्रकरणी रमेश बागवे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोहियानगर, गंज पेठ ते भवानी पेठेतील अरुणकुमार वैदय स्टेडियम दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे. नेमका चोरीचा हा प्रकार कसा घडला, याबाबत बागवे यांना समजू शकलेले नाही. त्यांनी आपले रिव्हॉल्व्हर कारमधील ड्रायव्हर सीटचे शेजारील सीटच्या मागील कप्प्यामध्ये ठेवले होते. चोरट्याने बागवे यांच्या कारची बनावट चावी तयार करुन किंवा कारचा दरवाजा उघडून कारमधील सीटमागील कप्प्यात ठेवलेले 1 लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर चोरुन नेले. खडक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
माजी गृह राज्यमंत्री बागवे यांच्या कारमधून रिव्हॉल्व्हर चोरीला गेल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली असून पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.