पुणे पोलिसांनी मागील २४ तासांत ६२ लाख रूपये जप्त केले असून एकूण ३ कोटी ९३ लाखांची रोकड जप्त करण्य़ात आली..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख :
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपेंच्या कार्यालयातून काल(शुक्रवार) रूपयांचं एक मोठं घबाड सापडलं होतं. त्यानंतर आज(शनिवार) सुपेंच्या मित्राकडून ५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.पुणे पोलिसांनी मागील २४ तासांत ६२ लाख रूपये जप्त केले असून एकूण ३ कोटी ९३ लाखांची रोकड जप्त करण्य़ात आली आहे.
जीए सॉफ्टेवअर कंपनीच्या प्रमुखाला अटक
तुकाराम सुपेंचे मित्र अश्विनकुमार जीए सॉफ्टेवअर कंपनीचे प्रमुख असून त्यांच्या घरातून चांदी,सोने,हिरे पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी सुपेंच्या कार्यालयातून २४ तासांत ५० लाखांपेक्षा अधिकची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. त्यानुसार आज सुद्धा सुपेंच्या मित्राकडून ५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच त्याला पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे.
तुकाराम सुपे यांच्या परिचिताकडून गुरूवारी रात्री २५ लाख रुपये पुणे पोलिसांनी जप्त केले होते. यानंतर पुन्हा पुणे पोलिसांनी ३३ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. मात्र, आज पोलिसांकडून ५ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
सुपेंच्या घरी पहिली धाड
तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या घरी पहिली धाड टाकली होती. त्यावेळी सुपेंच्या घरातून ८८ लाख ४९ हजार ९८० रोख, पाच ग्रॅम सोन्याचे नाणे आणि ५ लाख ५० हजार रूपयांची एफ डी केल्याची कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे सुपेंनी मित्राला लाखो रूपये दिल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांनी जी.ए सॉफ्टवेअर कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. आतापर्यंत ५ जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.