प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतातील ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते .परंतु सप्टेंबर २०२१ मध्ये जागतिक मानांकन यामध्ये शंभर क्रमांकाने घसरण झाली आहे .या घसरणीचा व विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यक्षमतेचा परिणाम शिक्षण व संशोधनात्मक प्रक्रियेवर होत असतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना वर्षा १९४८ मध्ये झाली. आजपर्यंत बरेचसे कुलगुरू या विद्यापीठाला लाभले. कुलगुरूंच्या कार्यकाळातील काही ठळक घडामोडी व निर्णयांचा परीणाम प्रत्यक्ष रीत्या विद्यापीठ प्रशासनावर होत असतो.
गेल्या २० ते २५ वर्षातील कुलगुरूंच्या कार्यकालातील ठळक घडामोडी पुढील प्रमाणे --
१.डॉ व्ही जी भिडे - संशोधन नवसंशोधन शिक्षणाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध व योग्य वापर. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राष्ट्रीय संरक्षण सल्लागार समितीचे सदस्य.
२.डॉ.अरुण निगवेकर-- इंडियन सायन्स काँग्रेसचे राष्ट्रीय चर्चासत्र पुणे विद्यापीठात आयोजन. विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचेमार्फत संशोधनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध. पुणे विद्यापीठातील संशोधनात्मक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन विद्यापीठ अनुदान आयोग ,नवी दिल्ली येथे अध्यक्ष म्हणून निवड .
३.डॉ.अशोक कोळसकर -- सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली यांचेमार्फत संशोधनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध. आंतरराष्ट्रीय संशोधन करार, बहिस्थ विद्यार्थ्यांकरता महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमार्फत नोंदणी, प्रवेश, परीक्षा प्रवेश पत्र नोंदणी. सदर योजना वर्ष २००५ ते २०२० पर्यंत यशस्वी वाटचाल. वर्ष २०२१ पासून बहिस्थ विभागच बंद. विद्यापीठ फंडाद्वारे मिळणाऱ्या व्याजातून कर्मचाऱ्यांनी जे गृहकर्ज घेतले आहे, त्यावर दोन टक्के सूट देण्याचा निर्णय. यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांची घरे होऊ शकली.
४. डॉ .वसंत गोवारीकर -- जयकर ग्रंथालयात विद्यार्थी अभ्यासिकेचे आधुनिकीकरण. विद्यार्थ्यांच्या विनंती अथवा तक्रार अर्जाना ७२ तासांत उत्तर देण्याचे कर्मचारी व अधिकारी यांना आव्हान. त्यावेळी मोबाईल नव्हते. त्यावेळेस संगणक, इंटरनेट यांचा फारसा उपयोग करीत नसताना कर्मचारी व अधिकारी यांनी हे आव्हान पूर्ण केले. त्याकरता कोणताही नियम करण्याची गरज भासली नाही .
५.डॉ.श्रीधर गुप्ते -- भारतातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची पुणे विद्यापीठात राष्ट्रीय बैठक व चर्चासत्र. भारतीय शिक्षण व संशोधन या विषयावर चर्चा. भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा संकल्प. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उच्च शिक्षण व संशोधनास वेतनी अध्ययन रजा तरतूद.
६.डॉ.रघुनाथ शेगावकर -- फक्त दीड वर्षे कुलगुरू पदावर होते परंतु कटू सत्य स्वीकारणारा व ते प्रामाणिकपणे व्यक्त करणारा हा कुलगुरू. "कुलगूरू पदाचा स्टेपिंग स्टोन म्हणून वापर केला जातो ",असे प्रामाणिकपणे बोलून सत्य स्वीकारणारा.
७.श्री रत्नाकर गायकवाड( भा प्र से) विद्यापीठात रिसर्च असोसिएट पदांची एक वर्ष करारावर निर्मिती. आज पर्यंत हा प्रकल्प चालू .संशोधक ,प्राध्यापक यांना संशोधन प्रकल्पासाठी कोट्यावधी रुपये वाटप. विद्यापीठ रस्त्यांना फूटपाथ ,विद्यार्थ्यांच्या वसती गृहांची दुरुस्ती ,नूतनीकरण .
८. डॉ .नरेंद्र जाधव-- कर्मचाऱ्यांना फॅमिली वेल्फेअर रक्कम वेतनात समाविष्ट .सनदी अधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर खुले व्याख्यान ,चर्चासत्र.विद्यार्थी कल्याण मंडळ ,कमवा व शिका योजनेचे सबलीकरण .
९.डॉ.संजय चहांदे( भा प्र से ) -फक्त सहा महिन्याचा कार्यकाल .परीक्षा विभाग सबलीकरण करण्यासाठी परीक्षा विभागाच्या प्रशासकीय कामाचे ऑडिट व त्यावर उपाययोजना .परीक्षा विभागासाठी अद्ययावत व प्रशस्त इमारत बांधण्याचा प्रस्ताव.
१०.डॉ.वासुदेव गाडे -- राष्ट्रीय मूल्यांकनात विद्यापीठास ए + ग्रेड मिळविण्यात यशस्वी. शासनामार्फत मुले व मुली यांना नवीन अद्ययावत व प्रशस्त वसतीगृहांचे बांधकाम व वापर. राष्ट्रीय उच्चतर शिक्षण आयोग यांचे मार्फत विद्यापीठास कोट्यावधीचा निधी उपलब्ध .सध्याचे कुलगुरू व प्रशासकीय अधिकारी या निधीचा वापर बांधकाम निर्मितीसाठी करीत आहेत
११.डॉ.नितीन करमाळकर-- वर्ष २०१७ मध्ये प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी विद्यापीठ अधिकार मंडळाच्या सदस्याचे चौकशी समिती, अद्याप अहवाल गुलदस्त्यात. वर्ष २०१८-१९ मध्ये पदवीप्रदान समारंभात ड्रेस कोड वरून वादळ .कुलसचिव यांना दिलेल्या ज्यादा वेतन व भत्ते यांची चौकशी समिती .कुलगुरू महोदयांनी स्वतःचा जुना सेवा कालखंड नियमित करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेत ठराव मंजूर केल्याप्रकरणी वर्तमानपत्रात बातम्या .गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये कडूलिंबाचे रोपांचे वाटप नोंद झाली .परंतु त्यातील आर्थिक गैरव्यवहाराबद्दल चौकशी समिती नेमली. एम .फिल ,पीएच.डी.से संशोधक विद्यार्थी यांचे विद्यावेतन मिळण्यासाठी उपोषण. प्र -कुलगुरूंच्या कार्यालयाची व्यवस्था करण्यासाठी जुन्या परीक्षा भागातून कर्मचाऱ्यांचे स्थलांतर (हाकालपट्टी ),प्रशासन शिक्षकेतर विभागातील कर्मचाऱ्यांची स्थलांतर (हकालपट्टी) .अपात्र अधिकाऱ्यास क्षमापित करून कार्यालयात पुन्हा नियुक्ती .पुणे विद्यापीठाचे नामांकन जागतिक स्तरावर १०० क्रमांकाने तर राष्ट्रीय स्तरावर १० क्रमांकाने खाली आले व घसरण झाली.
आता तुम्हीच ठरवा यशस्वी कुलगुरू कोण...?