खाजगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बसेसवर कारवाई न करण्यासाठी

5 हजारांची लाच घेताना लोणी काळभोर वाहतूक विभागातील पोलीस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

 पुणे - खाजगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बसेसवर कारवाई न करण्यासाठी एजन्सी व्यवस्थापकाकडे प्रति महिना 6 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती 5 हजारांची लाच घेताना लोणी काळभोर वाहतूक विभागातील पोलीस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.सुहास भास्कर हजारे (वय 35) असे लाचखोर शिपयाचे नाव आहे. त्याच्याविरोधात लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व्यवस्थापक असलेल्या एजन्सीच्या बसेसमार्फत पुणे ते सोलापूर असे प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यांच्या बसेसवर कारवाई न करण्यासाठी हजारे यांनी त्यांच्याकडे महिन्याला 6 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली.

पथकाने शुक्रवारी तक्रारीची पडताळणी केली असता, हजारे याने प्रतिमहिना 6 हजारांची मागणी करत तडजोडीअंती 5 हजारांची मागणी केली. त्यानंतर शनिवारी लोणीकाळभोर टोल नाक्‍याजवळ सापळा रचला. आणि पोलीस शिपाई सुहास हजारे याने पाच हजारांची लाच स्वीकारताच त्यास ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अलका सरग या करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post