पुणे विद्यापीठाच्या मास्टर माईंडला वर्ल्ड रँकिंगची धोबीपछाड



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख 

 पुणे : सप्टेंबर २०२१ मध्ये जागतिक शैक्षणिक संस्था व विद्यापीठांच्या जागतिक व राष्ट्रीय क्रमवारीची रँकिंग यादी जाहीर झाली.यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जागतिक स्तरावर शंभर क्रमांकाने पिछेहाट झाली, तर भारतामध्ये दहा क्रमांकाने घसरण झाली .टाईम हायर  एज्युकेशन ही संस्था जागतिक क्रमवारी जाहीर करते. त्यांना एल्स वियर्स स्कॉपस डेटाबेस नावाची संस्था जगभरातील विद्यापीठांची व शैक्षणिक संस्थांची माहिती संकलीत करून देते .विद्यापीठाच्या वेबसाईट ,ऑनलाइन, इंटरनेटवर असलेली माहिती संकलित करते. या सर्व डेटा चे वेगवेगळ्या स्वरूपात वर्गीकरण करते .या वर्गीकरणा मध्ये संशोधन व प्रकाशन( रिसर्च अँड पब्लिकेशन) हा महत्त्वाचा घटक मानला जातो .यामध्ये प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, संशोधक यांनी दिलेली व प्रकाशित केलेली पुस्तके ,पुस्तकातील प्रकरणे ,चर्चासत्र( राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय) ,प्रसिद्ध झालेले लेख यांचा प्रामुख्याने समावेश असतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च अँड पब्लिकेशन्स मध्ये दिलेली माहिती इतंभूत रित्या अथवा बारकाईने तपासल्यास तफावत जाणवेल .एकूण लेखांची संख्या ५४३२ ,प्रकाशित पुस्तके ३९५,चर्चासत्र ८१६, पुस्तकांमधील प्रकरणे ५७२ दिसतात. ही सर्व माहिती वर्ष २०११ पासूनची आहे. गेल्या अकरा वर्षात २०११ ते २०२१  एकूण ८२ विभागांतील माहिती दिली आहे .ही माहिती बारकाईने तपासल्यास ०७ विभाग यांच्यापुढे रिझल्ट नाँट फाउंड असे दिसेल. यातील प्रत्येक शैक्षणिक विभागाची विषय निहाय माहिती पाहिल्यास त्यात पुढील गोष्टी दिसतात. काही विभागांमध्ये एकाच प्राध्यापकाचे एखादे पुस्तक किंवा पुस्तकातील प्रकरण किंवा एखादी काँन्फरन्स दिसते. काही विभागांच्या २०१९ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या १४ प्राध्यापकांची, माजी कुलगुरूंची, माजी संशोधकांची जवळपास ३७० शोध प्रबंध ,६८ पुस्तके, २६८ पुस्तकांतील प्रकरणे ,८७ चर्चासत्रे यांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे एकूण आकडेवारीत कृत्रिम फुगवटा दिसत आहे. गेल्या ०४ वर्षात अगदी अल्प स्वरूपात प्राध्यापक, संशोधक यांच्या प्रकाशनाचे स्वरूप आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याची तुलना ऑक्सफर्ड विद्यापीठशी केली जाते. पुणे विद्यापीठाची वेबसाईट व ऑक्सफर्ड विद्यापीठाची वेबसाईट पाहिली असता आपणास यातील तफावत जाणवेल .

            


ऑक्सफर्ड विद्यापीठाचे वेबसाईट उघडली असता अतिशय साध्या प्रकारचे एकच चित्र दिसते त्यानंतर वेबसाईट मध्ये प्रवेश केल्यास सहजरीत्या सर्वसामान्य माणसाला कोणत्या प्रकारची माहिती हवी याचे चित्र दिसते. त्यामुळे सहजरीत्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची वेबसाईट हाताळणे शक्य होते .

             



परंतु पुणे विद्यापीठाची वेबसाईट पाहिली तर काय चित्र आहे किंवा भरमसाठ माहिती एकाच पृष्ठावर दिली आहे. एखाद्या व्यक्तीस किंवा विद्यार्थ्यास पुणे विद्यापीठाच्या होम पेज वरच सर्व गोष्ट शोधाव्या लागतात .वेबसाईट हाताळणारे ७५ टक्के अंडर ग्रँज्युएट विद्यार्थी, २५ टक्के कर्मचारी, प्राध्यापक व इतर असतात. हल्लीच्या तरुणांना यूजर फ्रेंडली वेबसाईट असणे गरजेचे आहे .पूर्वी एखाद्या व्यक्तीचे किंवा कंपनीचे किंवा संस्थेचे विजिटिंग कार्ड असायचे ,ते विजिटिंग कार्ड पाहिल्यानंतरच त्या कंपनीची प्रतिष्ठा ओळखली जायची. तसेच हल्ली वेबसाईट मुळे प्रतिष्ठा ओळखली जाते. पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर किती व्यक्तींचे फोटो व संदेश आहेत ? हे पहावे. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे फोटो व व्हिडिओज स्क्रोल होताना दिसतात. सदरचे फोटो व त्यासोबत ते संदेश होम पेजवर असण्याची आवश्यकता नाही. कारण विद्यार्थी, पालक, शिक्षक ,प्राध्यापक, संशोधक यांना अपेक्षित माहितीची गरज असते .हे फोटो व संदेश म्हणजे स्वतःचे शेफा/तोरा मिरवण्याचा प्रकार. ऑक्सफर्ड विद्यापीठात असो किंवा इतर परदेशी विद्यापीठ यांच्या वेबसाईटवर कोणत्याही व्यक्तीचे फोटो किंवा संदेश दिसत नाहीत. असे म्हणतात की फर्स्ट इम्प्रेशन लास्ट लॉंग. तसेच वेबसाईट व होमपेजची अपेक्षा आहे. पुणे विद्यापीठाची वेबसाईट  सर्वच गोष्टींचा पसारा असल्यासारखा दिसतो .लहानपणी शाळेत असताना एखाद्या प्रोजेक्ट द्वारे मुलांना काही माहिती संकलित करण्यास सांगितले जायचे. त्यावेळी ते वेगवेगळ्या प्रकारे सजावट  लहान मुलांना आवडे, त्यास बालिशपणा संबोधला जातो .परंतु विद्यापीठाने असा वेबसाईटचा बालिशपणा केल्यामुळे कदाचित वर्ल्ड रैंकिंग वाले नाराज झाले असावे. ऑक्सफर्ड विद्यापीठाची वेबसाईट म्हणजे साधी राहणी उच्च विचारसरणी .याचा प्रत्यय येतो .कोठेही भंपकपणा नाही .परंतु पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर फोटो, संदेश ,स्लाईड शो यांनी गर्दी केलेली आहे .तसेच विद्यापीठाच्या ए प्लस ग्रेडचे चिन्ह दाखविले आहे .परंतु ऑक्सफर्डच्या वेबसाईटवर असे कोणते चिन्ह नाही .चार महिने उलटले तरी विद्यापीठाचा जागतिक क्रमांक व राष्ट्रीय क्रमांक आहे तोच आहे. वास्तविक पुणे विद्यापीठाकडे किमान १० जाणकार  वेबसाईट संदर्भातील आहेत .यांना दर महिन्याला किमान प्रत्येकी ६० हजार ते ८० हजार वेतन आहे .यांना वर्षाकाठी ९०  लाख रुपये खर्च करून वेबसाईटची अशी दयनीय अवस्था का? पुणे विद्यापीठातील या दहा चतुर तज्ञांना कदाचित असे वाटले असेल ,"एवढ्या सगळ्या जगाच्या शैक्षणिक संस्था व विद्यापीठे यांची इतंभूत माहिती वर्ल्ड रँकिंग करणारी संस्था किंवा त्यांना माहिती पुरवणारे डेटाबेस संस्था पाहू शकणार नाही ".परंतु झाले उलटेच वर्ल्ड रँकिंग करणारे तज्ञ म्हणजे कोणी लल्लू - पंजू नाहीत.  या वर्ल्ड रँकिंग करणाऱ्या तज्ञांनी सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांच्यापुढे वेगळेच चित्र समोर आले असावे.त्यांनी पुणे विद्यापीठाचा जागतिक क्रमांक १००  ने खाली आणला .असे म्हटले जाते की पुणे विद्यापीठाच्या मास्टर मांईंडला वर्ल्ड रँकिंग तज्ञांनी धोबीपछाडच मारली. आता पुणे विद्यापीठाला पुन्हा मैदानात उतरायचे असेल तर पुढील वीस ते तीस वर्ष व्यायाम करावा लागेल. एखाद्या चुकीचे किती मोठे व गंभीर परिणाम भोगावे लागतात त्याचा हा नमुना आहे आहे.  







Post a Comment

Previous Post Next Post