सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज पासून कामकाज बंद चा संप पुकारला

आजपासून प्रशासकीय कामकाज बंद ,विद्यापीठाचा वित्त विभाग देखील बंद असल्याने लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प ,

अधिकारी वर्गाचा या बंद मध्ये सहभाग नाही

प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

अनवरअली शेख

 पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज पासून कामकाज बंद चा संप पुकारला आहे .आज पासून कोणतेही विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज होणार नाही. यापूर्वी कर्मचाऱ्यांनी शासन दरबारी निवेदने, चर्चा करूनही बऱ्याचशा प्रलंबित मागण्या शासनाकडून मान्य झाल्या नाही .यापूर्वी काळ्या फिती लावून, लेखनीबंद, निदर्शने यांचा अवलंब केला होता. परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. आजपासून प्रशासकीय कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. 

विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग बंद असल्याने विद्यार्थी ,पालक, प्राध्यापक यांची अडचण होत आहे. .या बंदचा परिणाम प्रत्यक्षपणे विद्यापीठांतर्गत असलेल्या पुणे, अहमदनगर ,नाशिक येथे असलेल्या  ९५० महाविद्यालये ,शैक्षणिक व संशोधन संस्था यावर होणार आहे. प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, प्रकल्प यावर हा परिणाम मोठ्या प्रमाणात होणार आहे .या मुळे विद्यापीठाचे वार्षिक शैक्षणिक कॅलेंडर, प्रवेश परीक्षा यांवर होणार आहे. 

विद्यापीठाचा वित्त विभाग देखील बंद असल्याने लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहे .विद्यापीठाशी संबंध शैक्षणिक संस्था, बँका ,शासकीय कार्यालय यांचे ऑनलाइन पद्धतीने होणारी प्रक्रिया ठप्प झाली आहे .

हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप जरी त्यांच्या मागण्यांसाठी असला, तरी अधिकारी वर्ग या मध्ये सहभागी नसल्याने व कार्यालय बंद असल्याने अधिकाऱ्यांनी प्रशासकीय इमारती समोरील बागेमध्ये गप्पांचा आस्वाद घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post