रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने धरणे आंदोलन

  सेझ धारक शेतकऱ्यांना 15 % परतावा मिळाला पाहिजे.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :. अनवरअली शेख: 

पुणे दि.९, विधान भवन येथे सेझ धारक शेतकरयांना १५ % परतावा मिळाला पाहिजे .यासाठी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे,

विभागीय आयुक्त  पुणे यांना निवेदाद्वारे मागणी करण्यात आली असून त्यात  " खेड सेझ प्रकल्पाचे बाबा कल्याणी यांच्यावर आदिवासी , दलित शेतकऱ्यांच्या फसवणुकी संदर्भात अॅट्रोसिटी अॅक्ट तसेच फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हावेत . तसेच खेड सेझ शेतकर्याना १५ % परतावा त्वरित द्यावा . त्यासाठी मा . मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त मीटिंग बाबतचे निश्चित दिनांक ठरलेले पत्र अन्यथा मुंबई येथे मंत्रालयात रिपाइं ( आठवले ) पक्षाचे पदाधिकारी व सेझ १५ % परतावा धारक शेतकरी आंदोलन  मिळावे . खेड सेझ प्रश्न गेले तेरा १३  वर्षापासून प्रलंबित आहे . शेतकऱ्यांनी या संदर्भात वेळोवेळी वेगवेगळी आंदोलने केली प्रशासनाला निवेदने दिली . तरीही हा प्रश्न प्रलंबित आहे . या प्रश्नाच्या अनुषंगाने दिनांक २७/११/२०२१ रोजी खेड पोलीस निरीक्षक , पोलीस स्टेशन ता . खेड , जि पुणे यांना खेड सेझ प्रकल्पाचे सर्वेसर्वा उद्योजक बाबा कल्याणी यांच्यावर आदिवासी / दलित शेतकऱ्यांची फसवणूक संदर्भात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदन / मागणी अर्ज दिला होता . परंतु त्यासंदर्भात कोणतीच कार्यवाही झाली नाही .

तसेच ०५/११/२०२१ दिवाळी पाडवा या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि खेड सेझ बाधित शेतकरी यांच्या वतीने भव्य निदर्शने आंदोलन करण्यात आले होते . त्यावेळेस प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त मीटिंग लावण्यास संदर्भातील आश्वासन दिले होते . परंतु उद्यापर्यंत त्याची पूर्तता केले नाही . त्यामुळे गुरुवार दिनांक ९ / १२ / २०२१ रोजी सेझ बाधित शेतकरी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) यांच्या संयुक्त विद्यमाने मा . श्री हरेश भाई देखणे प्रदेश सचिव , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) महाराष्ट्र राज्य .  आणि मा . संगीताताई आठवले, पश्चिम महाराष्ट्र , महिला आघाडी अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ठीक  ११:अकरा वाजेपासून जाहीर धरणे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे करण्यात आले आहे . या आंदोलना संदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे होत्या . १ ) खेड सेझ प्रकल्पाचे सर्वेसर्वा उद्योजक बाबा कल्याणी यांच्यावर आदिवासी / दलित शेतकऱ्यांच्या फसवणुकी संदर्भात अट्रोसिटी कायदा अंतर्गत / फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा . २ ) दि . ०५/११/२०२१ रोजीदिवाळी पाडव्याच्या दिवशी आंदोलनादरम्यान देण्यात आलेले . मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त मीटिंग बाबतचे आश्वासन पूर्ण करून संयुक्त मिटींगचे आयोजन बाबत निश्चित तारीख मिळाली . व त्यामध्ये पंधरा टक्के परतावा प्रश्न सोडविण्यात यावा . ३ ) खेड डेव्हलपर्स लिमिटेड ( K.D.I. ) कंपनी बरखास्त करण्यात यावी . ४ ) पंधरा टक्के परतावा प्रश्न शासकीय पातळीवरच मिटला जावा . खाजगी पातळीवर कोणतेही व्यवहार होऊ नये .

५ ) सेझ प्रकल्पाची जमीन संपादनाच्या वेळेत प्रकल्प उभारणीसाठी दिलेली मुदत संपल्यामुळे शेतकऱ्यांना विनामोबदला जमिनी परत करण्यात याव्यात . 

६ ) के . डी . एल . के.ई.आय.पी.एल कंपन्यांची ईडी मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी . दिनांक ० ९ / १२ / २०२१ . रोजी होणाऱ्या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही . व विभागीय आयुक्तांकडून खेड प्रकल्पाचे सर्वेसर्वा उद्योजक बाबा कल्याणी यांच्यावर आदिवासी , दलित शेतकऱ्यांच्या फसवणूक संदर्भात अॅट्रॉसिटी व फसवणुकीचे गुन्हें दाखल पुणे संदर्भात आदेश झाले नाही . तसेच माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली , पंधरा टक्के परतावा प्रश्नना संदर्भात संयुक्त मिटींगचे आयोजन होण्याबाबतचे निश्चित तारखेसह पत्र मिळाले नाही तर ! मुंबई , येथे मंत्रालयात घुसून केव्हा आणि कधी तीव्र स्वरूपाचे आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( आठवले ) आणि सैझ बाधित १५ टक्के परतावा धारक आदिवासी / दलित शेतकरी यांच्यावतीने करण्यात येईल व या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल अशी माहिती प्रेस मीडिया  च्या प्रतिनिधीला  सांगितली.

 श्री हरेश देखने ,मा . संगीताताई आठवले , शकुर शेख, सत्तार शेख यांनी दिले,त्यावेळी येथे१) मा . श्री हरेश देखने , ( प्रदेश सचिव , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र , राज्य . ) २ ) मा . संगीताताई आठवले , ( अध्यक्ष , पश्चिम महाराष्ट्र महिलाआघाडी . रि.पा.ई. उपस्थित होते.

  


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post