तर दुसऱ्या ठिकाणी विवाहित महिलेने आपल्या चार मुलांसह आत्महत्या केली
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख :
पुणे : : राज्यात दोन धक्कादायक घटना घडल्या. एका ठिकाणी महिला पोलीस अधिकाऱ्याने तर दुसऱ्या ठिकाणी विवाहित महिलेने आपल्या चार मुलांसह आत्महत्या केली. पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केली. विश्रांतवाडी येथील शांतीनगर भागातील राहत्या घरी त्यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. हा प्रकार दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आला.
शिल्पा चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्त्या केली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत होत्या. चव्हाण यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. तसेच कामाच्या बाबतीत देखील त्यांचा दरारा होता.
दरम्यान, लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक गरजू लोकांना मदतीचा हात देण्याबरोबरच 'ई-पास'ची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली होती. भरोसा सेलमध्ये देखील त्यांनी अनेक दिवस यशस्वीपणे कामगिरी पार पाडली
विवाहित महिलेची चार मुलांसह विहिरीत उडी
तर दुसऱ्या एका घटनेत विवाहित महिलेची चार मुलांसह विहिरीत उडी मारुन आपले जीवन संपले. जालना येथे या विवाहित महिलेने पोटच्या 4 मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घुंगर्डे हादगाव येथे आज सकाळी घटना उघडकीस आली.
कौटुंबिक वादातून या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याच बोलले जात आहे. या प्रकरणी गोंदी पोलीस अधिक तपास करत आहेत. 32 वर्षीय गंगासागर अडाणी असे विवाहित महिलेचं नाव आहे.13, 11 आणि 9 9 वर्षांच्या मुलीसह 7 वर्षांचा मुलगा यांच्या सह तिने स्वत: विहिरीत झोकून दिले. काल दुपारी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेली गंगासागर संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने शोध घेण्यास सुरुवात झाली. आज सकाळी पाचही जणांचे मृतदेह विहिरीत आढळले. पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे.