प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हडपसर मध्ये अर्ध्या तासात सर्वत्र पाणीच पाणी झाले. पुणे-सोलापूर महामार्ग ठिकठिकाणी पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक कोंडी झाली .
या मध्ये अमर बाग येथील चौक, रामोशी आळीकडे जाणारा रस्ता, मगरपट्टा चौक आणि लोहिया उद्यान समोरील रस्ता आणि अनेक अंतर्गत रस्त्यावर पाणीच पाणी झाले .
साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागली. हडपसर गावातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले होते. तर पुणे-सोलापूर महामार्गावर अमरबाग येथे साचलेल्या पाण्यातून वाहने पुढे घेताना अडथळा निर्माण झाल्याने काही तास वाहतूक कोंडी झाली होती. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने पार्कींग केलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.