जागतिक मानव अधिकार दिनी १० डिसेंबर रोजी देहू रोड दत्त मंदिरात शिबिराचे आयोजन.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
देहूरोड दि. ०७ :- १० डिसेंबर रोजी दत्त मंदिरात सकाळी १० वाजल्या पासून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबीरात रक्तदात्यास १ लाख रुपये विमा संरक्षण, प्रमाण पत्र देण्यात येणार आहे व जेव्हा आपल्याला रक्त पिशवीची आवश्यकता भासली तेव्हा मोफत रक्त पिशवी देण्याचे संबंधित प्रमाण पत्र प्रदान करण्यात येणार आहे तरी रक्त दात्यांनी भरपुर प्रमाणात आपले सहकार्या सह रक्त दान करावे व येताना सोबत आधार कार्ड, पेन कार्ड घेऊन यावे असे अवाहन ह्युमन राईट्स जस्टिस असोशियन च्या वतीने करण्यात आले आहे.
शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे. या शिबिराचे संयोजन ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर, जिल्हा अध्यक्ष इम्तियाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष अमीर आत्तार, जिल्हा सचिव चंद्रशेखर पात्रे, ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे, जिल्हा समन्वयक दीपक चौगुले, रफिक शेख करीत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते अमोल नाईकनवरे, धम्म नेते के. एच. सूर्यवंशी, प्रकाश कांबळे व त्याचे सहकारी विशेष सहकार्य करीत आहेत.
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 9975071717