प्रेस मीडिया वृत्तसेवा :
जीलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सकाळी १०.३० वाजता शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली झेंडा वंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार हे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उल्हास पवार म्हणाले, "देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाने जात, धर्म, पंथ, भाषा याला सोडून संपूर्ण भारतीयांना एका छताखाली आणण्याचे काम केले. काँग्रेस पक्षाने नेहमीच शेवटच्या माणसाच्या दृष्टीने विचार केला. स्वातंत्र्यसारखा उदात्त हेतू घेवून स्थापन झालेल्या काँग्रेस पक्ष हा भारतीयता व भारतीयांची ओळख असणारा पक्ष आहे."
यावेळी झेंडागीताने झेंडावंदन करण्यात आले. राष्ट्रगीताने सदर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, ॲड.अभय छाजेड, कमल व्यवहारे, आबा बागुल, अरविंद शिंदे, अजित दरेकर, अविनाश बागवे, नीता रजपूत, सुजाता शेट्टी, सोनाली मारणे, शिवाजी बांगर, मुख्तार शेख, बाळासाहेब मारणे, वाल्मिक जगताप, बाळासाहेब अमराळे, प्रकाश पवार, भुषण रानभरे, रजनी त्रिभुवन, निलेश बोराटे, प्रशांत सुरसे, सुनिल पंडित, सचिन आडेकर, प्रविण करपे, गणेश शेडगे, सुरेश कांबळे, अविनाश अडसूळ, राजू गायकवाड, गोरख पळसकर, दिलीप लोळगे आदींसह प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, सर्व सेल व ब्लॉकचे पदाधिकारी त्याचबरोबर काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.