पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रिक्षा बंद राहणार असल्याची माहिती 'बघतोय रिक्षावाला' संघटनेने दिली आहे.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख :
पुणे - रिक्षा संघटनांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी 30 डिसेंबरपासून बेमुदत रिक्षा बंद आंदोलन केले जाणार आहे. या कालावधीत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रिक्षा बंद राहणार असल्याची माहिती 'बघतोय रिक्षावाला' संघटनेने दिली आहे.
फायनन्स कंपन्या गुंडगिरी करत असल्याचा आरोप करत संघटनेने डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली उपोषण पुकारले आहे. मात्र, प्रशासन हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनाला महाराष्ट्र रिक्षा पंचायत, बीजेपी रिक्षा आघाडी, सावकाश रिक्षा संघटना, आम आदमी रिक्षा संघटना व इतर काही संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दोन्ही शहरांतील रिक्षाचालक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करणार आहेत, असेही संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.