पाण्याच्या टाकी आणि लाईनचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करा....अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेविका विजया वाडकर यांनी दिला.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख
पुणे : हडपसर येथील सर्वे नं 53, सेलेना पार्क सोसायटी जवळ, काळेपडळ येथील अंतिम टप्प्यात असलेल्या पाण्याच्या 25 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे.त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. पाण्याच्या टाकी आणि लाईनचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून परिसरातील नागरिकांना पुरेशा पाणी पुरवठा करावा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेविका विजया वाडकर यांनी दिला.
हांडेवाडी रोड, काळेपडळ परिसरातील गृहरचना सोसायट्यांचे पदाधिकारी व रहिवासी यांच्या सोबत माजी नगरसेविका वाडकर यांनी या कामाची पाहणी केली, त्या वेळेस त्या बोलत होत्या.यावेळी विकास भुजबळ, अमोल पाटकर ,राहुल दाते, अतुल फड, पदमरत्न कांबळे, भास्कर सानप, कल्पक बोरसे ,नरेंद्र बंगाले, अनिल वरगट, विलास मोरे, विष्णू भोंग ,ज्योतिबा कोळी, गणेश नायडू ,लीलाधर पाटील, नंदन श्रीवास्तव, संजय झा, विशाल कुलकर्णी ,संगमेश कळसकर ,अनिल भुजबळ, नवदीप गुप्ता, राजेश बंडा, प्रसाद घोलप, अभिषेक राज ,आदेश पतुला, विविध सोसायट्यांचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
या परिसरात गृहरचना सोसायट्या मोठ्या प्रमाणावर असून यामध्ये सुभाष पार्क, जैन टाऊनशिप, इशा एम्पायर, इताशा, गिनी संस्कृती, रुणवाल, गंगा व्हिलेज, 5th अवेन्यू, सिद्धिविनायक विहार, सनराइज, अथर्व ईसीपी वास्तू नमो विहार, अशोका नगर, नीलेश क्लासिक, आशियाना, ड्रीम्सओनीला, ड्रीम्स एलेगन्स,ड्रीम्स एलिना, ड्रीम्स सोलेस, ड्रीम्स आकृती, कोहिनूर, ड्रिम्स इस्टेट, सुयश पार्क, कुमार पेबल पार्क ,समृद्धी, नवरत्न एक्झोटीका
,फिलोसिया, मयूर जेमिनी, राहुल ईस्ट व्हा,ऑर्चर्ड, डायनॅमिक, रतन हौसिंग,आयरीन, यशराज प्रिमो, नीलेश समृद्धी, ग्रीन सिटी, मंत्रा मेमोरीज ,फ्लोरिस्टा काउंटी, रवी पार्क, 48 ईस्ट,ARV रॉयल या गृहरचना सोसायट्या व चिंतामणी नगर, सय्यद नगर, गुलामाली नगर, उद्योग नगर, सातव नगर, संतोष नगर, इंदिरानगर, दुगड चाळ, काळेपडळ असा परिसर असून या परिसरात सर्वात मोठा प्रश्न आहे पाण्याचा.
वेळी-अवेळी, कमी दाबाने, दिवसाआड, तीन-चार दिवसांनी फक्त तासभर पाणीपुरवठा पामुळे या परिसरातील नागरिक हैराण झालेले आहेत. या भागातील सर्व गृहरचना सोसायटीतील देखभाल खर्च( मेन्टेनन्स) पाण्याच्या पैशात वाया जात आहे. म्हणून मी नगरसेविका असताना पाच वर्षाच्या काळात या प्रश्नाला प्राधान्य देऊन हा पाणी प्रश्न सुटावा म्हणून खूप मेहनत घेऊन सर्वे नंबर 53, सेलेना पार्क सोसायटी जवळ महापालिकेची अमेनिटी स्पेसची जागा ताब्यात
घेऊन 25 लाख लिटर पाण्याची टाकी बांधण्याची योजना आखली. रक्कम रुपये साडेपाच कोटी टाकी बांधण्याचे टेंडर 16/11/2014 रोजी काढून ठेकेदाराला कामाचे आदेश देण्यात आले.
रक्कम रुपये साडेचार कोटीचे रामटेकडी ते टाकीपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे टेंडर 10/11/2014 रोजी काढून ठेकेदाराला कामाचे आदेश देण्यात आले. या कामाचा भूमिपूजन समारंभ तत्कालीन महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या शुभहस्ते व त्यावेळचे आमदार योगेश अण्णा टिळेकर व माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. माझ्या
काळात टाकीचे व पाईप लाईनचे बरेचसे काम झाले होते. दुर्दैवाने मला सन 2017 च्या महापालिकेच्या निवडणुकीत अपयश आले. परंतु अजून पर्यंत या टाकीचे काम पूर्ण झालेले नाही.
वेळोवेळी आपण पाणी पुरवठा विभाग मनपाकड़े माहिती घेतली असता सिव्हिल कोर्टात संबंधित ठेकेदार मेसर्स एच. एच. रुपानी व इलेक्ट्रो कास्टिंग स्टील यांचेमधील असलेल्या वादामुळे सिव्हिल कोर्टात दरखास्त क्रमांक 54/2016 दाखल झालेली होती. त्यानंतर कोर्टाने दिनांक 9/1/2018 रोजी ही दरखास्त रद्द केली व टाकीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. मे 2021 पर्यंत काम पूर्ण होऊन नागरिकांना पाणी मिळेल असे माहिती माहिती अधिकारात
लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
त्यानंतर ऑगस्ट, ऑक्टोबर पर्यंत पाणी मिळेल असे सांगण्यात आले .अजूनही काम पूर्ण झालेले नाही. जवळ जवळ सात वर्षे होऊन सुद्धा हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे गृहरचना सोसायटीतील व परिसरातील नागरिकांना ज्यादा पैसे देऊन टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे आता तरी लोकप्रतिनिधींनी घेणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी या कामाला प्रथम प्राधान्य देऊन हे काम पूर्ण करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी नगरसेविका विजया वाडकर यांनी केली. अन्यथा या परिसरातील नागरिक लोकप्रतिनिधींना निवडणुकीमध्ये पाणी पाजल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा माजी नगरसेविका विजया वाडकर यांनी दिला.