प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : परवाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी महाविद्यालय व शैक्षणिक विभागांना आदेश दिले विद्यार्थ्यांना संशोधनास प्रोत्साहन द्या तरुणांना रोजगार मिळण्याच्या उद्देशाने स्मार्ट ट्रेनिंग आणि इनोवेशन सेंटरची घोषणाही केली आज या कुलगुरू महोदयांना का आठवले..? वर्ष २००९-१० मध्ये सध्याच्या कुलगुरू महोदयांना( त्यावेळी प्राध्यापक असताना) तत्कालीन कुलगुरू डॉ. शेगावकर यांनी नवसंशोधन व उपक्रम या संकल्पनेचे प्रमुख पद दिले होते .
सध्याचे कुलगुरू वर्ष २०१५-१६ मध्ये राष्ट्रीय उच्चतर समितीचे विद्यापीठ स्तरावरील सहसमन्वयक होते. पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय मूल्यांकनाच्या वेळी वर्ष २०१६ मध्ये समन्वयक म्हणून काम केले. परंतु कुलगुरू पदावर वर्ष २०१७ मध्ये नियुक्ती झाल्यानंतर हे सर्व थंडावले सप्टेंबर २०२१ मध्ये पुणे विद्यापीठाचे नामांकन जागतिक स्तरावर शंभर क्रमांकाने खाली आले. आता कुलगुरूंना सेवा निवृत्तीसाठी पाच महिने कालावधी शिल्लक आहे. १९४८ मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती गेल्या त्र्याहत्तर वर्षातील शंभर क्रमांकाने पीछेहाट होणे ही पहिलीच वेळ आहे. आता ही झिज भरून येण्यास किमान वीस ते तीस वर्ष श्रम घ्यावे लागतील. परंतु सध्या कुलगुरूंनी सुरू केलेला नवसंशोधन ,स्मार्ट ट्रेनिंग ,इंनोवेशन सेंटर यांचा जाहीरनामा म्हणजे जाता- जाता आभाळाला ठिगळ लावण्याचा प्रकार असावा .कुलगुरू महोदयांना बहुधा माहित नसावे संशोधन प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद नाही. कारण सध्याचे प्रभारी वित्त व लेखा अधिकारी व कुलसचिव यांच्याकडे आर्थिक तरतूदी अभावी संशोधन प्रकल्प धूळ खात पडले आहेत आता ठिगळं कुठे कुठे लावणार ..? अशी चर्चा संशोधकांमध्ये केली जात आहे. परंतु ही ठिगळे लावताना वर्ष २०१७-१८ मध्ये पदवीप्रदान समारंभाच्या वेळेस ड्रेस कोडचे जे वादळ झालं, तसे वादळ आता या ठिगळांच्या रंगसंगती, आकार इत्यादींबाबत होऊ नये असे वाटते. याबाबत विश्वस्तांनी देखील खबरदारी घ्यावी.