बांधकाम व्यवसायिक अग्रिम गोयल व आर्किटेक्ट प्रमोद देशपांडे यांच्यावर विश्रांतवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख
पुणे : जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील धानोरी येथे प्रकल्प उभारताना नामांकित बांधकाम व्यावसायिकाने शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.बांधकाम व्यवसायिक अग्रिम गोयल व आर्किटेक्ट प्रमोद देशपांडे यांनी पुणे म्हाडा येथे बनावट प्रतिज्ञापत्र , हमीपत्र व खोटे प्लॅन सादर करत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यामध्ये गोयल यांनी म्हाडासह तब्बल 56 सदनिका धारकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पुणे म्हाडाने बांधकाम व्यवसायिक अग्रिम गोयल व आर्किटेक्ट प्रमोद देशपांडे यांच्यावर विश्रांतवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत पुणे गुर्हा निर्माण वक्षेत्रविकास महामंडळाच्या मुख्य उपभियांता आशा हेमंत भोसले यांनी गोयाल व देशपांडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
अशी केली फसवणूक
बांधकाम व्यवसायिक अग्रिम गोयल यांनी धानोरी येथील सर्व्हे क्रमांक24/1/2/3/4/5/10 व सर्व्हे क्रमांक 67 / 1 बी /10 या मिळकतीवर ईडब्लूएस व एलआयजी धारकांसाठी ५६ सदनिकांची स्वतंत्र योजना उभारली. गोयल यांनी स्वतःच्या आर्थिक फायदा करून घेत , म्हाडासाठी योजना राबवत असताना बांधकामाच्या बदल्यात अधिकचा एफएसआयचा फायदा घेतला. याबाबत म्हाडाच्या कार्यालयात खोटे प्रतिज्ञापत्र , हमीपत्र देत म्हाडासह 56 सदनिकाधारकांची फसवणूक केली.
शासकीय योजनेच्या फायद्यांसाठी केली फसवणूक
शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आर्किटेक्ट प्रमोद देशपांडे याने खोटे व रचनात्मक बिल्डिंग प्लॅन तयार केले. हे खोटे प्लॅन म्हाडाकडे सादर करत ते मंजूर करून घेतले. त्यामध्ये बिल्डरने तब्बल 56 सदनिका धारकांची फसवणूक केली आहे.