प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचे नगरसेवकपद उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी बागवे यांना सहा आठवड्यांची मुदत न्यायालयाने दिली आहे.
बागवे हे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत लोहियानगर भागातून निवडून आले आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याने प्रतिस्पर्धी उमेदवार अॅड. भुपेंद्र शेडगे यांनी लघुवाद न्यायालयात दावा केला होता. त्यात बागवे यांनी बेकायदा बांधकामाची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे न्यायालयाने बागवे यांचे नगरसेवक पद रद्द केले. या विरोधात बागवे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तेथे देखील बागवे लघुवाद न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत नगरसेवक पद रद्द ठरविले आहे. आता बागवे यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची संधी दिली आहे.
''उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आम्ही आदर करतो. या आदेशावर ६ आठवड्यांची स्थगिती असून, या विरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.
- अविनाश बागवे