कलाक्षेत्रातील कलाकार ,सेवकांचे प्रश्न सोडवू :लोकजनशक्ती पार्टीचे आश्वासन

  बॅकस्टेज आर्टिस्ट ,नेपथ्य  कलाकारांचा  लोकजनशक्ती पार्टीमध्ये प्रवेश .

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे : कोरोना लाटेनंतर सावरत असलेल्या कलाक्षेत्रातील कलाकारांना उभारी मिळण्यासाठी त्यांचे सर्व प्रश्न सोडवू असे आश्वासन आज लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने देण्यात आले . 

 कलाक्षेत्रातील बॅकस्टेज नेपथ्य  कलाकार, साऊंड लाईट क्षेत्रातील साऊंड इंजिनिअर, ऑपरेटर, मेकअप आर्टिस्ट अशा अनेक जणांनी पुण्यात  रामविलास पासवान प्रणित  लोक जनशक्ती पार्टी मध्ये प्रवेश केला. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आले. 

  राष्ट्रीय अध्यक्ष खा.चिराग पासवान यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून महाराष्ट्र प्रदेश सचीव अमर पुणेकर व पुणे शहर,जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांच्या उपस्थितीत  शुक्रवार, दि.3 डिसेंबर रोजी  पक्ष  प्रवेश केला.

या प्रसंगी बॅकस्टेज आर्टिस्ट, मेकअप आर्टिस्ट, साऊंड लाईट क्षेत्रातील साऊंड इंजिनिअर, ऑपरेटर यांच्या समस्या सोडवण्यासाठी लोक जनशक्ती पार्टी नेहमी खंबीरपणे पाठीशी उभी राहील.लवकरच सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन या सर्व कलाकारांच्या समस्या मांडण्याचे आश्वासन संजय आल्हाट यांनी दिले.

  सदर प्रसंगी रणजित सोनावळे, प्रदीप निकम, संदीप देशमुख, सुधीर फडतरे, अभिजीत प्रकाश इनामदार, सचिन सस्ते, उत्तम कांबळे, दत्तात्रय शिंदे, मुकुंद डिंबळे, चंदन माळी, दत्तात्रय गाडेकर, अभिजित कदम, गणेश माळवदकर, शंतनू कोतवाल, संतोष गायकवाड, अरुण मयाचार्य, प्रदीप जाधव, स्वप्नील दळवी, अनंता करपे, हरीश ढोकळे, सचिन फुलपगार, प्रताप रोकडे तसेच पुणे शहर संघटक आप्पा पाटील पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस के सी पवार पुणे शहर सचिव कन्हैया पाटोळे पर्वती मतदार संघ संघटक बंडू वाघमारे इत्यादी उपस्थित होते


Post a Comment

Previous Post Next Post