भाजी पाल्याचे भावात 40 ते 50 टक्क्यांनी घसरल..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख :
पुणे- राज्यभर पडलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. धुकं, सातत्यानं सुरु असलेल्या पावसामुळं शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन भाजी पाल्याचे भावात 40 ते 50 टक्क्यांनी घसरले आहेत. शहरातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसामुळं भाजी पाल्याच्या खरेदीस ग्राहकांची वर्दळ ही कमी झाली आहे.
काय आहेत भाज्यांचे भाव...
पुणे मार्केटयार्डमध्ये मटार 20 रुपये किलो, मिरची 10 ते 12 रूपये किलो, बीट 20 रुपये, काकडी 20 रुपये, गाजर 15 रुपये किलो,कोथिंबीर 6 ते 7 रुपये,मेथी 8 ते 10 रुपये, पालक 15 रुपये, वांगी 25 ते 30 रुपये किलो आहेत. मागील आठवड्यात ८० ते १०० किलो असलेला टोमॅटो 25 ते 30 रुपये किलोवर आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतमालाचे भाव गडाडल्याने शेतमाल अत्यंतकिरकोळ भावत विक्री सुरु केली आहे.
कांद्याचेही मोठे नुकसान
पुणे जिल्ह्यातील चाकण बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कांद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. कांदा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या कांद्याचे लिलाव होण्यापूर्वीच अवकाळी पाऊस आल्याने हे नुकसान झाले असून खेड बाजार समितीकडे कांदा ठेवण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने यात कांदा उत्पादक शेतकरी भरडला आहे.