महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या

 मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या स्मृतिदिनास कोटी कोटी प्रणाम...


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

    फातिमा शेख यांनी भारतातील शिक्षण प्रसारात मोलाची भर घातली त्या काळी पुरुष समाजाचे वर्चस्व होते या समाजाने हिंदू धर्म आणि परंपरेच्या नावाखाली दलित आदिवासी आणि मुस्लिम समाजातील स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नाकारला होता त्यामुळे या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा ही फातिमा शेख यांची ठाम भूमिका होती त्यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्यासह अस्पृश्य आणि मुस्लिम समाजातील स्त्रिया व मुलांना शिकवण्याचे काम केले हे काम म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी चालू केलेल्या सत्यशोधक चळवळीचा एक भाग होता

फातिमा शेख या उस्मान शेख यांच्या भगिनी होत्या . ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी अठराशे ४८ साली दलित मुले आणि स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली मात्र हे कृत्य धर्मविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला त्यातूनच त्यांच्या कुटुंबियांनी आणि गावातील इतर लोकांनीही या दाम्पत्यावर बहिष्कार टाकला फुले दांपत्याला घराबाहेर काढले अशा वेळी उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी त्यांना राहण्यासाठी आणि शाळा चालवण्यासाठी राहते घर दिले या दाम्पत्याच्या कल्पनेने प्रेरित होऊन उस्मान शेख यांनीही फातिमा शेख यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले त्याचबरोबर शिक्षणापासून वंचित असणाऱ्या समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रोत्साहन दिले सावित्रीबाई फुले यांच्याबरोबर शिक्षिका होण्यासाठी फातिमा शेख यांनीही खूप हालअपेष्टा सोसल्या .

पुरुष जाती व्यवस्थेविरुद्ध महात्मा फुले यांनी लढा पुकारला होता . मात्र त्यांच्यासोबत शेख यांनादेखील सामाजिक क्रोशाचा छळाचा सामना करावा लागला . शेख यांना तर मुस्लीम आणि हिंदू दोन्ही धर्मातील लोक धर्मद्रोही मानायला लागले . फातिमा शेख मुलींना शिकविण्याचे काम करत असत . घरोघरी जाऊन मुलींच्या पालकांना भेटून मुलींना शाळेत पाठवण्यासाठी सांगत असत . शाळेचे कामकाजही त्याच बघत असत . त्यामुळे फुले दाम्पत्याचे शिक्षण कार्य पुढे नेण्यात फातिमा शेख यांचा मोलाचा वाटा आहे . शिक्षणाचे कार्य अखंडपणे चालू राहण्यासाठी त्यांनी पराक्रमाची पराकाष्टा केली . सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिराव फुले यांना लिहिलेल्या पत्रामध्ये फातिमा शेख यांच्या बद्दलच्या प्रेमाचा आणि त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख आढळून येतो . मात्र शेख यांनी स्वतःविषयी आपल्या कार्याविषयी काहीच लिहिले नाही . त्यादृष्टीने सावित्रीबाईंची ही पत्रे फातिमा शेख यांच्या योगदाना विषयी माहिती देण्यास महत्त्वाचा स्त्रोत आहेत

दीर्घ काळाच्या प्रयत्नानंतर आत्ता कुठे समाजाला सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची जाणीव झाली आहे . मात्र फातिमा शेख अजूनही विस्मृतीच्या पडद्याआड अडकुण आहेत . भारताच्या इतिहासात अशा अनेक महान स्त्रिया आहेत ज्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची साधी दखलही कोणी घेतली नाही . फातिमा शेख हे त्यापैकीच एक नाव . अल्पसंख्यांक जाती आणि अनुसूचित जाती जमाती अशा सर्व प्रकारच्या लोकांसाठी त्यांनी लढा दिला . दलित आणि मुस्लिम मुले व महिलांना साक्षर करणे हे त्यांचे ध्येय होते . त्यामुळे त्यांना हिंदू धर्मातील लोकां बरोबरच सनातनी मुस्लिमांच्या विरोधात नाही तोंड द्यावे लागले . मुस्लिम स्त्री म्हणून त्यांनी कायम उपेक्षा सहन केली आणि स्वतःच्या जीवितास धोका निर्माण होईल असा समाज सुधारणेचा लढाही त्या लढल्या . हे त्या टाळू हि शकत होत्या मात्र केवळ दलित आदिवासी स्त्रिया व मुलांच्या हक्कांसाठी त्यांनी हे केले पहिल्या काही भारतीय मुस्लिम स्त्री शिक्षकांमध्ये त्यांची गणना होते .

महाराष्ट्र सरकारने शेख यांच्या योगदानाची दखल २०१४ साली घेतली . उर्दू शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकात आता डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ,सर सय्यद अहमद खान ,झाकीर हुसेन, यांच्यासह फातिमा यांच्या ही कार्याचा संक्षिप्त माहितीचा समावेश आहे . फातिमा शेख या महान स्त्री शिक्षिकेस मानाचा मुजरा व त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ...



अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post