एक परदेशी महिला, एक कर्नाटक आणि तीन महाराष्ट्रातील पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड वाकड परिसरात शहराच्या अगदी मध्य भागात स्पा च्या नावाखाली कुंटनखाना चालवणाऱ्याना पोलिसांनी तत्परतेने केले अटक.
महिलांच्या कडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय चालवणा-या स्पा सेंटरवर सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी छापा टाकला. यामध्ये एक परदेशी महिला, एक कर्नाटक आणि तीन महाराष्ट्रातील पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी स्पा चालक मालक, महिला मॅनेजर आणि आणखी एक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजबळ चौक, हिंजवडी येथील दि ॲड्रेस कमर्शिया मॉलमध्ये ब्लॉसम सलून व स्पा सेंटरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
सचिन सुरेश भिसे (वय 33, रा. उस्मानाबाद), मोहिनी फुलचंद घुगे / लहु सोनवणे (वय 25, रा. काळेवाडी) आणि अभय मारूतीराव छिद्री (वय 40, रा, काळेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिडित महिलांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होते. प्रति ग्राहक ते तीन हजार रूपये एवढे पैसे घ्यायचे. सामजिक सुरक्षा पथकाने याठिकाणी छापा टाकत पाच महिलाची सुटका केली आहे. तिथून तीस हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुटका केलेल्या महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.