प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख :
गुंठेवारीनुसार ३१ डिसेंबर २०२० पूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत झालेली बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्या साठीच्या अर्जासोबत बांधकाम पूर्णत्वाचा कर संकलन विभागाचा आणि जलनि:सारण विभागाचा ड्रेनेज कनेक्शन दाखला आवश्यक आहे. या दाखल्यांऐवजी मालमत्ता धारकाचे अर्थात जागामालकाचे प्रतिज्ञापत्र आणि आर्किटेक्ट यांचा दाखला घ्यावा आणि बांधकामे नियमित करण्याबाबतच्या परिपत्रकात दुरुस्ती करावी, असा निर्णय महापालिका स्थायी समिती सभेने घेतला.
त्यासाठीच्या कागदपत्रांमध्ये दुरुस्ती करण्याची उपसूचना मंजूर केली. गुंठेवारीचे बांधकाम करण्यासाठी मालमत्ताधारकांना कागदपत्रांसह २१ फेब्रुवारी २०२२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश दिले आहे.
बांधकाम नियमितीकरणासाठी २१डिसेंबर २०२० पूर्वी बांधकाम पूर्णत्वाचा करसंकलन विभागाचा आणि जलनि:सारण विभागाचा ड्रेनेज कनेक्शन दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. त्याऐवजी मिळकत धारकाचे अर्थात जागामालकाचे प्रतिज्ञापत्र आणि आर्किटेक्ट यांचा दाखला घ्यावा. बांधकामाची २०१९-२०आणि २०२०-२१या वर्षांची मालमत्ताकर भरणा पावती घ्यावी. मालमत्ताकर भरलेला नसल्यास करसंकलन विभागाने कर भरण्यासाठी दिलेली मागणी पावती अर्जा सोबत घेण्यात यावी. यानुसार परिपत्रक काढावे, अशी उपसूचना स्थायी समितीने मंजूर केली.