रेशन कार्ड धारकांनी तात्काळ E K Y C करून घेण्याचे आवाहन
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड देहूरोड पाठोपाठ रेशन कार्ड डिलिट होण्याचे प्रकार नागपूर शहरात सुद्धा घडले ,काही तांत्रिक अडचणी मुळे हा प्रकार घडला आहे असे सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार समजले , देहूरोड परिसरातील नागरिक आणि अन्न धान्य वितरण विभाग अधिकारी यांच्यात आपसात गैर समज निर्माण झाला होता. या बाबत वरिष्ठांना तक्रार ही नोंदवण्यात आली होती. या बाबतचे बातमी प्रेस मीडिया मध्ये प्रसिद्ध होताच सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.
प्रेस मीडियाचे पुणे जिल्हा प्रतिनिधी यांनी पिंपरी चिचवड निगडी येतील संत तुकाराम महाराज संकुल येथे अन्न धान्य वितरण विभाग, रेशन कार्ड दफ्तराला भेट देऊन सर्व माहिती घेतली , या बाबत सर्व अधिकारी यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला की शिधा पत्रिका (राशन कार्ड)धारकांना काय उत्तर द्यावे ? परंतु तेथील वरिष्ठ अधिकारी दिनेश तावरे अन्न धान्य वितरण विभाग अधिकारी यांनी अति सुंदर पणे परिस्थिती हाताळत सर्वांची समजूत काढली व तत्परता दाखवत सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की तक्रादारांची ताबडतोब दखल घेऊन त्यांची कामे व्यवस्थित पणें करा , दिनेश तावरे यांनी तत्काळ शिधा वाटप दुकानदारांची मीटिंग बोलावली व त्यांना विनंती केली ज्या कार्ड धारकांचा डेटा उडाला आहे त्यांना राशन साठी थांबऊ नये त्यांना तात्काळ राशन देण्यात यावे असे सांगण्यात आले. मानवतेच्या दृष्टिकोनातून आजच्या कोरोना नंतरच्या काळात गरजेचं आहे असे ही सांगितले . या बाबत दुकादारांकडून ही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून तसेच त्यांनी प्रेस मीडियाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना जाहीर आवाहन केलं आहे की राशन कार्ड धारकांनी ई के वाय सी
( E KYC) करून घ्यावे व कोणाला काही ही समस्या असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधावा आवाहन करण्यात आले आहे.
प्रेस मीडियाचे अभिनंदन...!
संगणातून शिधा पत्रिका धारकांचा डाटा डिलिट झाल्याचे वृत्त प्रेस मीडिया मधून प्रसिद्ध होताच शिधा पत्रिका धारकांची तारांबळ उडाली तसेच संबंधित अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली होती. या बाबत आमचे प्रतिनिधी अनवरअली शेख यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन वस्तूस्तीची माहिती घेऊन तेथील अधिकाऱ्यांनी शिधा पत्रिका धारकांना रेशन देण्यात येईल असे सांगण्यात आल्याने शिधा पत्रिका धारकांनी प्रेस मीडिया व प्रतिनिधी यांचे मनःपूर्वक आभार मानून अभिनंदन ही केले तसेच या पुढे आम्ही सदैव प्रेस मीडियाच्या पाठीशी राहु असे ही सांगितले.
*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*