वाहन चालक त्रस्त, वाहतुकीची कोंडी..पोलिसांनी तत्परतेने काही पाऊल उचलण्याची गरज ..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड दि.२८ वाकड कडून विशाल नगर जाणारा रस्ता भर चौकात सिग्नल वर भीक मागत तुमच्याकडे टाळ्या वाजवत येणारे तृतीयपंथी नेहमीच आपल्याला दिसतात परंतु हल्ली काही वेळा ते आक्रमक होऊन रस्त्यावर थैमान घालताना सुद्धा दिसतात मी स्वतः प्रत्यक्ष पणे आज दुपारी एका नवरदेवाची सजवलेली कार भर चौकात सिग्नल वर अडवणूक करून त्यांना पैशाची मागणी करता ना आठ दहा तृतीयपंथी पाहिले सिग्नल यंत्रणा आणि वाहतूक कोंडीमुळे लोक त्रस्त झालेले असतात आणि त्यांच्याकडून सिग्नल वर भीक मागणारे व भिकेच्या नावाखाली तृतीयपंथी असल्याचा फायदा घेऊन तरुणांना आकर्षित करून पैसा उकळण्याचा धंदा जोरात सुरू आहे , लग्नाच्या मंडपात जाण्यासाठी निघालेल्या एका वधूची गाडी अडवून पैसे काढतानाचे चित्र, त्यामुळे होणारा मानसिक त्रास सहन करावा लागतो.
माझी अशी विनंती आहे की या प्रकारच्या भीक मागणीला पोलिस प्रशासनाने कारवाई करून त्यांना शिस्त शिकवायला सुरुवात केली पाहिजे वाहतूक कोंडी,आणि त्यात भर रस्त्यावर तृतीयपंथी पैशाची मागणी करतात गाड्या अडवून अशी ही बाब समोर आली आहे त्या वर पिंपरी चिंचवड पुणे शहर पोलिसांनी तत्परतेने काही पाऊल उचलण्याची गरज आहे.नागरिकांना सद्याच्या प्रस्तीतीत फार मोठा मानसिक दिलासा मिळेल,पिंपरी चिंचवड वाकड परिसरात नागरिकांकडून अशी मागणी होत आहे
*जाहिरात व बातम्यांसाठी प्रेस मीडिया लाईव्ह*