महापालिकेच्या कच्या आराखड्याची तपासणी स्वत: निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान करत आहेत.

 आराखड्यात राज्य निवडणूक आयोगाने काही बदल सुचविले आहेत.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :  अन्वरअली शेख :

महापालिकेने निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा सादर केलेला कच्चा प्रारुप आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडून जशाच तसा स्वीकारला जात नाही. कच्या आराखड्याची तपासणी स्वत: निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान करत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या प्रभाग रचनेचा कच्च्या प्रारुप आराखड्यात राज्य निवडणूक आयोगाने काही बदल सुचविल्याचे सांगितले जात होते तसेच आराखडा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली केल्याचे आरोप झाले होते.

चार प्रभागाच्याऐवजी तीन सदस्यांचा एक प्रभाग होणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग बदलणार असून आराखडा कधी जाहीर होईल, हे सांगता येणार नाही. निवडणुका लांबणीवर जातील काय याबाबतही काही माहित नसल्याचे यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

प्रत्येक आराखडा जशाच तसा स्वीकारला जात नाही. कच्च्या आराखड्याची तपासणी स्वत: निवडणूक आयुक्त करत आहेत. बदल सूचवितात. त्यांना मान्य असेल तरच ते आराखडा स्वीकारतात. चार प्रभागाच्याऐवजी तीन प्रभाग होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभाग बदलणार आहे. नवीन प्रभाग तयार होणार आहेत. त्यामुळे प्रभाग रचना व्यवस्थित झाली नाही असे म्हणना-यांनी कोणत्या आधारावर झाली नाही हे सांगावे.

हरकती सुचना घेण्याची संधी आहे. प्रभाग रचना करताना भौगोलिक सीमा पाळल्या आहेत. ब्लॉक तोडले नाहीत. जनतेसाठी आराखडा कधी जाहीर होईल हे सांगता येणार नाही. निवडणुका लांबणीवर जातील काय याबाबत विचारले असता त्याबाबत काही माहिती नसल्याचे आयुक्त पाटील म्हणाले. निवडणुका लांबणीवर जातील काय याबाबतही काही माहित नसल्याचे यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post