अधिकृत की अनधिकृत पद्धतीने केली जात आहेत याची खात्री नागरिकांनीच करून घ्यावीत..
प्रेस मीडिया वृतसेवा
अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड महापलिकेच्या निवडणुकांपूर्वी अचानक जनतेची आठवण आली म्हणून जागे झालेले भावी नगरसेवक एन्ड कंपनी आपल्या कामाला लागलेले असतात त्यासाठी भावी नगरसेवक म्हणून मिरवणारे जोमात असतात कुठे फलक बाजी , कुठे जनतेचे सेवक म्हणून नळ जोडणी करून देणे आप-आपल्या प्रभागात भावी नगरसेवक मंडळ अढळून येत आहे ,त्यात मुख्य म्हणजे एक कामाचा प्रकार पिण्याच्या पाण्यासाठी नळ जोडणी आहे,अशी अनेक कामे नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहून केली जातात जणू की आपण भावी नगरसेवकच आहोत . आता नागरिकांची एक महत्वाची जबाबदारी एक नागरिक म्हणून आहे की , नळ जोडणी किंवा इतर कोणत्याही प्रकारची कामे असो ती अधिकृत आहेत किंवा अनधिकृत आहेत याची खात्री करून घ्यावीत कारण भावी नगरसेवक म्हणून मिरवणारे जोमात येऊन काही वेळा अनधिकृत पद्धतीने ही कर्मचऱ्यांच्या मदतीने ओळख पाळख दाखून कामे करून घेतलेली असतात .
पाणीपुरवठा नळ जोडणी एक महत्वाची बाब आहे , आता या बाबत संबंधित अधिकारी , अभियंते विभागीय अधिकारी यांनी तत्काळ बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे आहे, व नागरिकांनी देखील आपली काही फसवणूक तर होत नाही ना म्हणून सावध राहिले पाहिजे,कारण नंतर आपणालाच त्रास सहन करावा लागणार आहे, पिंपरी चिंचवड पुणे शहरचे एक सुशिक्षित नागरिक म्हणून सतर्क रहावे असे मत नाव न सांगण्याच्या अटीवर प्रभाग क्रमांक १६ मध्ये एका नागरिकाने व्यक्त केली आहे