देहूरोड येथील अनेक नागरिकांचे शिधापत्रिका ( राशन कार्ड ) संगणका वरून डिलिट होण्याचे प्रकार

 संबंधित विभाग झोपा काढत आहे का..?


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पिंपरी चिंचवड : देहूरोड येथील अनेक नागरिकांचे शिधा पत्रिका ( राशन कार्ड ) संगणका वरून डिलिट होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे देहूरोड शहरात नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.कोरोणा काळात अनेक नागरिकांचे कामं सुटले आहेत जवळ पैसे नाही सरकारने त्यांना त्यांच्या हक्काचे दिलेले राशन ही आता मिळणार नाही कारण त्यांचे राशन कार्ड-च चक्क  डिलिट होण्याचे प्रकार घडत आहेत म्हणून अनेक लोक हवालदील झाले आहेत.

 


एका नागरिकाने अशी माहिती दिली की मी मागच्या महिन्यात शिधा वाटप दुकानदार कडून राशन ही घेतले होते परंतु दुसऱ्याच महिन्यात शिधा पत्रिका ऑन लाईन दुकानदाराला मशीन वर दिसत नाही अर्थातच राशन कार्ड डिलिट झाले आहे, राशन कार्ड बंद झाल्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे राशन मिळणार नाही आणि राशन कार्ड पुन्हा चालू करण्यासाठी आवश्यक कागपत्रांसह निगडी येथील ( परिमंडळ अधिकारी अ विभाग चिंचवड )  यांच्या दफ्तराच्या चकरा माराव्या लागतात तिथे उडवा उडवी चे उत्तरे देऊन अधिकाऱ्यानंकडून  नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो, अधिकारी यांच्या गैर जबादारीमुले राशन कार्ड संगणकावरून डिलिट अथवा बंद झाल्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे राशन मिळणार नाही गोर-गरीब  अश्या महागाईच्या  परिस्थितीत कसे जगणार याचे जबाबदार संबंधित असलेल्या विभागीय अधिकारी आहेत का ? 

असा प्रश्न निर्माण झाला आहे, संगणका वरून आपोआप तर शिधा पत्रिका (राशन कार्ड) डिलिट होणार नाही ना ? संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांच्या भोंगाल करोभरा मुळेच तर झाले नाही का ? असा  ही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे,अशाच प्रकारच्या अन्य धान्य वितरण विभागाच्या  बेजबाबारपणामुळे अनेजणांनी आपले हकाचे राशन गमावलेले आहेत,ही वस्तुस्थिती उपासमारी कडे देशाला ढकलण्याची आहे.  असे अनेकजणांनी अपले प्रश्न आणि व्यथा  सौ अर्चनाताई राऊत (    महिला उपाध्यक्षा   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड ) यांच्याकडे मांडल्या आहेत व त्यांनी कागदोत्री पाठ पुरावा करत - सचिन ढोले साहेब अन्न धान्य वितरण विभाग पुणे यांच्या मार्फत पत्र पाठवले आहे,

माननीय अजित दादा पवार ( उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री पुणे जिल्हा )

 मा श्री भुजबळ साहेब  -  ( मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ) 

 मा श्री  रूपालीलाई चाकणकर ( महाराष्ट्र राज्य महिला आयोग )

मा  श्री डॉ विश्वजीत पतंगराव कदम ( राज्यमंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ) 

दिनेश तावरे साहेब ( परिमंडळ अधिकारी अ विभाग चिंचवड ) पत्ता : - संत तुकाराम बाप्पा संकुलन पहिला मजला निगडी ४११०४४

यांना पत्रका द्वारे निवेदन सादर केला आहे त्यात नागरिकांचे  तत्परतेने राशन कार्ड पुन्हा चालू करण्यासाठी सांगण्यात आले आहे व बेजबाबदार शिधा वाटप  दुकानदार व अधिकारी यांच्या वर कारवाईची ही मागणी केली आहे,

अशी माहिती प्रेस मीडियाचे मुख्य प्रतिनिधीशी बोलताना अर्चना ताई  यांनी दिली तसेच अर्चनाताई  राऊत महिला उपाध्यक्षा  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड,यांनी देहूरोड शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे की ज्यांचे शिधा पत्रिका राशन कार्ड बंद आहे त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post