पिंपरी चिंचवड मनपा सुरक्षा विभागाच्या कामावर प्रभावी व सक्षम नियंत्रण नसल्याचा ठपका

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :  अनवरअली शेख :

पिं ची. महापालिकेच्या मिळकती, इमारतीची सुरक्षा करण्यासाठी विविध सुरक्षा एजन्सी मार्फत नेमलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या कामकाजात विविध त्रुटी आढळून आल्या आहेत. नोंदणीनुसार कर्मचारी कामावर गैरहजर, त्यांची जागी अन्य व्यक्तीची नेमणूक, गणवेश परिधान न करणे, ओळखपत्र नसने, महापालिकेचे बनावट ओळखपत्र असल्याचे पाहणीत आढळून आले. 

सुरक्षा विभागामध्ये सद्यस्थितीत कार्यरत असलेले सुरक्षा निरीक्षक, सुरक्षा सुपरवायझर या पदावरील कर्मचा-यांना वायसीएम रुग्णालय, जम्बो कोविड सेंटर येथे तीन्ही पाळ्यामध्ये ड्युट्या असल्याने महापालिका मिळकती वरील तपासणी करण्याकामी अडथळा, दिरंगाई निर्माण झाल्याचे त्यांनी खुलाशात कबुल केले. यापुढे अशा स्वरुपाच्या त्रुटी आढळणार नसल्याची ग्वाही दिली. सुरक्षा एजन्सी मार्फत नेमलेल्या रखवालदारांच्या मदतनीसांच्या कामकाजाची दक्षता व नियंत्रण कक्षामार्फत तपासणी केली. त्यामध्ये प्रत्यक्ष पाहणीत नोंदीनुसार कर्मचारी उपस्थित नसणे, महापालिकेचे बनावट ओळखपत्र असणे, सतत गैरहजर असणे अशा गंभीर स्वरुपाच्या त्रुटी आढळून आल्या.

त्या मुळे दुरगुडे आणि जरांडे यांचे सुरक्षा विभागाच्या कामकाजावर प्रभावी व सक्षम नियंत्रण नसल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. त्यांनी पर्यवेक्षकीय कर्तव्यामध्ये कसूर केली. त्यांना केलेला खुलासा आणि तपासणी आढलेल्या त्रुटी विचारात घेता एक वेळ संधी म्हणून दुरगुडे, जरांडे यांना सक्त ताकीद दिली आहे. या पुढे भविष्यात सुरक्षा विभागाच्या कामकाजात अशा स्वरुराची अनियमितता आढल्यास कडक व जबर शास्ती कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद करण्याचा आदेश दिला आहे.

महापालिकेच्या मिळकती, इमारतीची सुरक्षा करण्यासाठी विविध सुरक्षा एजन्सीमार्फत खासगी सुरक्षारक्षक, मदतनीसांची नेमणूक करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांच्या कामकाजा विषयी दक्षता व नियंत्रण कक्षामार्फत 9 सप्टेंबर 2021 रोजी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्रुटी व उणिवा निदर्शनास आले. त्यामुळे दुरगुडे, जरांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post