स्पेशल रिपोर्ट : शहरात दुचाकी टॅक्सी वाहतूकची धूम

 विविध कंपन्यांच्या अॅपच्या जाळ्या पुढे आरटीओ यंत्रणाही हैराण


प्रेस मीडिया वृत्तसेवा :. अनवरअली शेख : 

स्पेशल रिपोर्ट :  पिंपरी चिंचवड मध्ये शहरातंर्गत प्रवास सेवेसाठी सध्या दुचाकी टॅक्सीचा वापर गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे . त्या माध्यमातून ऑनलाईन टॅक्सीचे अॅपचे पेव फुटले आहेत . ऑनलाईन • वाहतुकीला रिक्षा संघटनेकडून विरोध सुरू असताना आता नुकत्याच सुरू झालेल्या दुचाकी टॅक्सीचा मोठा वापर वाढला आहे . यापूर्वी प्रवासासाठी वापरण्यात येणारे रिक्षा , मोटारीवर नियंत्रण ठेवणारी आरटीओ यंत्रणा या दुचाकी टॅक्सीच्या जाळ्यापुढे हैराण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे . या माध्यमातून होणारे नियमांचे उल्लंघन आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी आरटीओ कारवाई करणार आहे . 

 सेवेसाठी कायदा काय सांगतो ?

 दुचाकी वाहन संवर्गामध्ये हे ना वाहतूक सेवा ( नॉन ट्रान्सपोर्ट ) आहे . त्यामुळे त्यास परवानगी नाही . मोटार वाहन कायदा १ ९ ८८ मध्ये रेन्ट अ मोटार सायकल स्किम १ ९९ ७ उपलब्ध असून , त्यात वापरात येणारी वाहने ही भाडोत्री परिवाहन संवर्गात नोंद असणे आवश्यक आहे . राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरच हा व्यवसाय सुरु करता येतो .

   *पब्लिक वाहतूकदारांना चालक जवळ पब्लिक ट्रान्सपोर्ट परवाना आणि बॅच बिल्ला असणे आवश्यक असते. दुचाकी टॅक्सी वाहतूक करणाऱ्या चालक का जवळ पब्लिक ट्रांसपोर्टेशन लायसन आणि बॅच आहे की नाही.? बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत . कंपनीचे लोकेशन ट्रॅक करताना तांत्रिक अडचणी येत आहेत . सहा वाहनांवर कारवाई केली आहे . कंपन्यांचे लोकेशन मिळाले की त्यांना नोटीस पाठवणार आहोत .

अतुल आदे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा कंपनीच्या विरोधातच कारवाई करणे गरजेचे आहे .आणि त्या कंपन्यांच्या अॅप्लिकेशनवरून दुचाकी टॅक्सीचा पर्याय काढून टाकण्यात यावा . परिवहन कार्यालयाला आम्ही १५ दिवसाची मुदत दिली आहे .त्या नंतर आंदोलन तीव्र करणार आहोत . -

 डॉ . केशव क्षीरसागर , अध्यक्ष , बघतोय रिक्षावाला संघटना



*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post