ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठराविक वेळेत बंदी....पोलीस उपायुक्त आनंद भोईटे

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठराविक वेळेसाठी बंदी घालण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सोमवारी  याबाबतचे आदेश दिले आहेत.

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी ९;०० ते दुपारी १;०० पर्यंत बंदी असेल. त्यानंतर दुपारी १;००ते सायंकाळी ५;०० पर्यंत शहरातून ऊस वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा सायंकाळी ५;०० ते रात्री ९;०० पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा रात्री ९;०० ते सकाळी ९;०० पर्यंत ऊस वाहतूक करणारी वाहने शहरातून धावू शकतात.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कासरसाई येथे श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे. शहरातून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. परिणामी वाहतूकीस अडथळा होऊन कोंडी होते. अनेकदा ऊस वाहतूक करणारी वाहने पलटी झाली, टायर फुटल्याने अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे यांनी रहदारीच्या वेळेत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदीचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post