काळेवाडी ड्राइवर कॉलोनी येथील मक्का मस्जिद जवळ रोड वर ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर

महापालिका सफाई विभाग झोपेत नागरिकांचे आरोग्य धोक्यात.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख

पिंपरी चिंचवड दि.१० काळेवाडी ड्राइवर कॉलोनी येथील मक्का मस्जिद जवळ रोड वर ड्रेनेजचे घाण पाणी फुल होऊन रस्त्यावर  पसरू लागले आहे,  जागो जागी घाण पाणी रस्त्यावर जमा झालेले आहे  या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  या बाबत वारंवार तक्रार करूनही ही कुठलाच प्रतिसाद मिळत नाही  . महापालिका सफाई विभाग अधिकारी , अभियंते झोपेतून जागे  केव्हा होणार.?  एकीकडे स्मार्ट सिटी, स्वच्छता अभियानांतर्गत मोठ मोठ्या रकमा निधी देण्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात परंतु सत्य  आपल्याच शहरात आपणा सर्वांना रस्त्यावर पाहायला मिळत आहे.

   कोरोना, डेंग्यू , मलेरिया , सारखे घातक आजार पाय पसरवत असताना जर  हे ड्रेनेजचे घाण पाणी असेच रस्त्यावर साचू लागले तर नागरिकांचे आरोग्य नक्कीच धोक्यात येईल , याला जबाबदार कौन.. .? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.



*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post