नट सम्राट निळूफुले रंगमंदिरात १ जानेवारीला पुरस्कार प्रदान होणार
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख :
पिंपरी दि. २९ समाजा मध्ये स्वताचे स्वार्थ न बघता लोक हिता साठी नेहमी काम करणार्याचे समाजाने दखल घेऊन त्यांची कार्याची पावती देणे हे समाजाचे काम आहे असेच समाज कार्य करणारे राजाराम दादा अस्वरे यांना रमेश दादा बागवे प्रतिष्ठानच्या वतीने शौर्य पुरुस्कार जाहीर झाल्याने सर्व क्षेत्रातुन राजाराम दादा अस्वरे यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे देहूरोड मधील समाजिक धम्म, क्रिडा क्षेत्रासह मानवतावादी नेते राजाराम दादा अस्वरे यांना त्यांनी भारत सरकारच्या लष्करी अभियंता विभागात ३४ वर्ष देश सेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे पुणे शहर जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे प्रतिष्ठान संस्थेने दखल घेऊन राजाराम दादा अस्वरे यांना २०२२ चे शौर्य पुरस्कार जाहीर केले आहे. १/१/२०२२ जानेवारीला पिंपळे गुरव येथील नट सम्राट निळू फुले रंगमंदिरात ४ ते ६ या वेळेत पुरस्कार वितरण समारंभात राजाराम दादा अस्वरे यांना २०२२चे शौर्य पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे. राजाराम दादा अस्वरे भारत सरकार संरक्षण मंत्रालयाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या लष्करी अभियंता विभागात तंत्र अधिकारी उच्चपदावर कार्यरत असताना त्यांनी देशातील अनेक राज्यासह अंदमान निकोबार सह महाराष्ट्रात खडकी, पुणे, मुंबई या ठिकाणी महत्वपूर्ण ३४ वर्षे लष्करी सेवा करून ६० व्या वर्षी सेवा निवृत्त झाले. देश सेवा मध्ये उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन रमेश दादा बागवे प्रतिष्ठानच्या वतीने सन २०२२ चा शौर्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे ,,
*अशी माहिती श्री चंद्रशेखर पात्रे यांनी प्रेस मीडियाच्या प्रतिनिधीला दिली*
राजाराम दादा अस्वरे उच्चपदस्थ अधिकारी पदी कार्यरत असताना श्रमिक कामगारांच्या अडीअडचणी ची दखल घेत त्वरित समस्या सोडवित असे व सर्वाना नेहमी न्याय देण्याचा काम ते करत असे सर्वाशी नेहमी प्रेमाने बोलुन कामगार हिता साठी नेहमी अधिकार्याशी दोन हात करत असे. त्यांनी देश सेवेत कार्यरत असताना कधी विश्रांती घेतली नाही रात्रदिवस सामाजा साठी झटत असे. इंजीनियर असल्याने त्यानी पुणे जिल्या मध्ये सर्वधर्म समभाव म्हणत बुद्ध विहार, मंदिर मस्जिद, चर्च उभारण्यात मोठे योगदान दिले आहे. धम्म भुमी देहू रोड ऐतिहासिक बुद्धविहाराचे अत्यंत दुरावस्था झाली असताना धम्मभूमी देहूरोड येथे बुद्धविहारा च्या भक्कम पाया भरणी करून लक्षवेधी सुंदर असे विहाराचे सुशोभीकरणात म्हत्व पुर्ण योगदान दिले आहे. देहूरोड शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वार उभारणी कार्यात त्यांचा महत्वपूर्ण योगदान आहे. प्राणी पक्षी प्रेमी असल्याने ते सर्व मुके प्राण्याणवर नेहमी प्रेम करत कबुतर, चिमणी, कावळे पक्षी यांना धान्य टाकने, भटक्या कुत्र्यांना बिस्किट चारणे, भुखलेल्यांना गरीब गरजू लोकांना अन्नदान देणे असे अन्न दाता म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे.असा मानवतावादी कार्य नित्य करत असतात त्याच बरोबर लायन्स क्लब च्या माध्यमिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. गोर गरीब मुलांना त्याचा फिस मध्ये सवलत देणे काही गरीबांचे फिस माफ करणे तर काहीचे स्वत फिस भरणे अशा मानवतावादी काम ते करत आहे.धम्म ,सामाजिक, क्रीडा ,शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या राजाराम दादा अस्वरे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. राजाराम दादा अस्वरे यांना यापूर्वी धम्म भूमीत समाजरत्न पुरस्कार, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे मानव विकास संस्था बीड संस्थेच्या वतीने समाज रत्न पुरस्कार, धम्म भुमी देहू रोड सामाजिक संस्थेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. आता नववर्षी १ जानेवारी २०२२ रोजी या नव वर्षदिनी राजाराम दादा अस्वरे यांना रमेश दादा बागवे प्रतिष्ठान च्या वतीने २०२२ चा शौर्य पुरस्काराने सन्मान होत आहे. त्यामुळे अनेक त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.