पिंपरी : डॉक्‍टरने अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

घटना महापालिकेच्या आऊटगेटवर घडली.त्यामुळे एकच खळबळ उडाली 



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख

 पिंपरी -महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या डॉक्‍टरने अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 17) दुपारी तीनच्या सुमारास महापालिकेच्या आऊटगेटवर घडली.त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे याबाबत दिलेल्या माहितीनुसार महेंद्र अच्युतराव चाटे (वय-31, रा. मोशी) असे या डॉक्‍टरचे नाव आहे. त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून कंत्राटदाराकडून पगार मिळालेला नाही. संबंधित डॉक्‍टरांचे वडील हे लष्करात जवान होते. त्यांचे निधन झालेले आहे. महेंद्र यांना पगार न मिळाल्याने त्यांना नैराश्‍य आले होते.

त्या नैराश्‍यातून त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर येऊन अंगावर डिझेल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला थांबविले. सुरक्षा अधिकारी गोफणे यांनी याबाबत तत्काळ पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित डॉक्‍टरांकडून लाईटर जप्त केला. याबाबत संबंधित डॉक्‍टरची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post