हटके बॅनरची सध्या पिंपरी चिंचवड शहरात चर्चा

आता हे पोस्टर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे..


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळे बॅनर्स, पोस्टर लावले जातात. हटके बॅनर लावून कधी कुणी नाटकाचे, चित्रपटाचे किंवा गृहप्रकल्पाची प्रसिद्धी करते तर कुणी प्रशासनावर वाभाडे काढतात.असाच एका हटके बॅनरची सध्या पिंपरी चिंचवड शहरात चर्चा रंगली आहे.

'सहावीला पिंपरी-चिंचवडला आलो' असे भल्यामोठ्या अक्षरात लिहिला हा फ्लेक्स सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील नेहरुनगर - यशवंतनगर रस्त्यावर हा फ्लेक्स उभारण्यात आला आहे. यापूर्वी 'शिवडे - आय एम सॉरी' या पोस्टरने शहरात खळबळ उडवून दिली होती, त्यानंतर आता हे पोस्टर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फ्लेक्स लावला कुणी आणि यावर लिहिलेल्या वाक्याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.

दरम्यान, एका व्यवसायिकाने हा हटके फ्लेक्स लावला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, नेमका याचा अर्थ काय ? आणि कशाची प्रसिद्धी करण्याच्या उद्देशाने हा फ्लेक्स उभारला आहे अशी चर्चा नागरिक करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post