प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड दि. ५ आकुर्डी खिदमते-ए-आवाम वेल्फेअर असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कायकर्ता संमेलन आकुर्डी येथील बिना इंग्लिश मिडीयम स्कूलच्या हॉल मधे आनंदमय वातावरणात कार्यकर्त्यांच्या अति सुंदर नियोजपूर्वक पद्धतीने संपन्न झाला.
पिंपरी चिंचवड येथील विविध भागातील तरुण पिढी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामाजिक संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड मधे लोक डाऊन काळात घरो घरी राशन वाटप, औषध, मेडिकल , दवाखान्यात उपचार गरजू लोकांना सेवा करण्याचे काम हाती घेतले होते, व सर्व जातधर्माच्या मयतांचे अंतिम संस्कार त्या त्या धर्मानुसार करण्यात मोठा सहभाग होता, ही संस्था कुठलाही जाती मद भेद न करता सर्वांना मदतीचा हात पुढे करत असते २०१३ पासून ही संस्था गोर गरीबांचे गरजू लोकांना,प्रत्यक शेत्रात आहे मोलाचा वाटा उचलत आहे,गरजूंना मदत म्हणन कपडे वाटप, सांगली येथील पुर ग्रस्त लोकांना मदत,महाड चिपळूण रत्नागिरी पूर परिस्थिती मदतीचा हात पुढे करत त्या वेळी भरपूर मदत कार्य करणारी ही संस्था,
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे पद अधिकारी हाफीज हुजैफा यांनी पवित्र कुराण पठण केले, व हांजला यांनी नात पाक मधुर वाणी मधे गायले त्या नंतर संस्थेचे अध्यक्ष सोहेल मोमीन यांनी खिदमते-ए-आवाम वेल्फेअर असोसिएशन च्या कामांची माहिती सर्वांन समोस अति सद्या पद्धतीने सादर केली,व नईमुद्दिन पटेल यांनी २०१३ पासून असोसिएशन च्या वाटचाली बद्दल माहिती दिली.
पुढे डॉ अश्फाक बांगी यांनीअसोसिएशन चे केलेले काम आणि भविष्यातील नियोजनावर चर्चा केली, आमच्या स्वतःच्या संस्थेमध्ये आमच्या स्वयंसेवकांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि शासनाकडून वैद्यकीय लाभ योजना गोरगरीब जनतेसाठी मिळून देण्याचे काम खिदमते-ए-आवाम वेल्फेअर असोसिएशन नी हाती घेतलं आहे अशी माहिती दिली, या वेळी प्रमुख उपस्थिती गुलाम मुस्तफा साहेब (पूर्व पोलिस अधिकारी) अब्दुल तालिब साहेब प्रमुख (बैतूल माल च्यारीटेबल ट्रस्ट मुंबई )
मोलाना सकिब साहेब प्रमुख (रेहमान फाऊंडेशन पुणे)
मुप्फती अय्युब साहेब, मोलाना अलीम साहेब, मोलाना आ.शकुर साहेब,मोलाना आ गफ्फार साहेब आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,
गुलाम मुस्तफा साहेब यांनी आपल मनोगत व्यक्त करताना सर्व प्रथम असोशियेन चं कौतुक केलं व सरकारी आरोग्य योजनेची माहिती दिली,ते पुढे म्हणाले सरकारी आरोग्य योजना हे गरजू लोकांच हक्क आहे भीक नव्हे तर सामाजिक उपक्रम राबवत जनतेला या योजनांची माहिती देणे गरजेचे आहे,आणि ही माहिती सेवा भावी काम करणारे संघटनेची जवाबदारी आहे,
रेहमान फाऊंडेशन पुणे चे अध्यक्ष मोलाना साकिब साहेब म्हणाले देशाच्या तरुण पिढीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेले संविधान वाचन करण्याची गरज आहे,
हुसैन भाई यांनी आापल्या वेख्यानात सागितले की सरकारी आरोग्य योजना मिळिण्याकरिता आपले कागदोपत्र आधार,पेन, शिधा पत्रिका यावर आपले नाव व पत्ता बरोबर असणे आवश्यक असते, त्यासाठी सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू लोकांना ही मदत ही केली पाहिजे,
इकबाल खान फौंडर (बिना इंग्लिश मिडीयम स्कूल) यांनी सर्वांचे आभार मानले,
त्यावेळी खिदमते-ए-आवाम वेल्फेअर असोसिएशन चे
अध्यक्ष सोहेल मोमीन,
जॉईन चेरमन डॉ अश्फाक बांगि, सेकेट्री रिजवान शेख,
जॉईन सेकेट्री नईम पटेल,
खाजांची जावेद झेंडे,
सह खाजांची हाफीज हूजैफा,
नाजिम नालबंद,
आसिफ शेख,
शादाब सय्यद,
मजहर शेख,
साबीर सय्यद, अझहर शेख,
हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जण समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते,
*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क अन्वरअली शेख 9975071717*