मदरसा इशातूल इस्लाम कासारवाडी व सुगरा क्लिनिक,ऑप्टिमम लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने

आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उस्फूर्त  प्रतिसाद मिळाला..



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पिंपरी चिंचवड दि.१९ कासरवाडी गुलिस्तान नगर येथील उर्दू शाळेत मोफत वैद्यकीय शिबिर मोफत  आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते, मदरसा दारुल उलूम इशातुल इस्लाम (कासारवाडी पुणे) व सुगरा क्लिनिक , ऑप्टिमम लॅब ,मोलना अलीम,  मुबारक व्हालेकर व मदरसा ईशातुल इस्लाम या संस्थेचे अध्यक्ष जुनेद खान यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी भरपूर श्रम केले आहे,

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अभिनव खरे (M.B.B.S.M.D.), व सूगरा क्लिनिक, मदरसा इशातूल इस्लाम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे,

या महागाईच्या काळात सामान्य माणसाच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची बाब वैदाकिय खर्च आहे, आज  वैदकिय तपासण्या औषधे  भरपूर महाग झाले आहे, व वाढत्या रोगराईच्या पार्श्वभूमीवर या  मेडिकल शिबिराचा लाभ सर्व  सामान्य जनतेला दिलासा देणारा ठरेल अशी  कासारवाडी परिसरातील नागरिकांची प्रतीक्रिया आहे

 कासारवाडी येथील डॉ.  अल्लामा इक्बाल उर्दू स्कूल मस्जिद समोर  गुलिस्तान नगर मोफत वैद्यकीय शिबिर मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी स्पंदन हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉ.  अभिनव खरे (M.B.B.S.M.D.), डॉ.  पद्मजा हवालदार (लेडीज स्पेकलिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ ) यांचे डॉक्टर .  शिबिरात उपस्थित होते. 

 रविवारी  आजारावरील सल्ले व औषध दिले जाणार आहे.  19/12/2021 रोजी सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत पत्ता: डॉ.  अल्लामा इक्बाल उर्द शाळा गुलिस्तान नगर, कासारवाडी, पुणे हा शिबिर घेण्यात आले, तसेच मदरसा इशातुल इस्लाम येथे  दर दिवशी अति अल्प दरात औषधे व आरोग्य तपासण्या केल्या जातात लॅब तपासण्या  50% सवलत दरात केले जाईल  व अति अल्प दरात औषधे दिले जाणार आहे, सुगारा क्लिनिक  , व मदरसा इशायतूल इस्लाम यांच्या संयुक्त विद्यमाने दर दिवशी आरोग्य तपासण्या केल्या जातात ,  बी.पी.  तपासणी, साखर तपासनी ,थायरॉईड तपासनी, रक्तगट  तपासणी, नियमित आरोग्य तपासनी, गर्भवती महिला तपासनी , या सर्व तपासण्या व चेकाप केले जाणार आहे, डॉ.अभिवाव खरे यांनी डॉ  जावेद मलिक डॉ.  सानिया शेख , पद्मजा हवालदार (लेडीज स्पेशालिस्ट) डॉ.  खतिजा, डॉ.  मरियम आदी प्रमुख वैदकीय काम  पाहणार आहे,



 *जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post