बिर्ला हॉस्पिटल मध्ये उपचाराच्या नावाखाली रुग्णांची लुट......
खासदार श्रीरंग बारणे
प्रेस मीडिया वृत्तसेवा :. अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड दि ६.चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल नाव घेताच काळजात धडकी भरते,इलाज करून बरा झालेला माणूस बिल बघून परत आजारी पडतो की काय ? हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांकडून अवास्तव बिलांची आकारणी केली गेली. शासकीय योजनांचा रुग्णांना लाभ दिला नाही. हॉस्पिटल प्रशासन नातेवाईकांना उद्धटपणे वागणूक देते. बिर्लामध्ये मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. या हॉस्पिटलबाबत अनेक तक्रारी येत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षात हॉस्पिटलमध्ये झालेल्या मृत्यूंची, अवास्तव बिल वसुलीची सखोल चौकशी करुन उचित कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.
या हॉस्पिटलबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांकडून वाढीव बिले आकारली जातात. त्याचबरोबर आगाऊ व पैसे वेळेवर भरले नाही तर रुग्णांचा उपचार तत्काळहॉस्पिटल विषयी अनेक तक्रारी आहेत. याप्रकरणी राज्य सरकारने हॉस्पिटलची चौकशीही केली आहे. एखादा रुग्णाचा मृत्यू झाल्यास पूर्ण पैसे जमा केले जात नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात दिला जात नव्हता. अनेक दिवस हॉस्पिटलमध्येच मृतदेह ठेवला जातो. नियमानुसार १२ तासात मृतदेहावर अंत्यसंस्कार होणे आवश्यक आहे. थांबवला जातो. यामुळे रुग्ण दगावले जातात. विमा धारक रुग्णांकडून अवाजवी बील आकारणी केली जाते.
कमी उत्पन्न गटातील राखीव बेड रुग्णांना दिले जात नाहीत.हॉस्पिटलमध्ये सरकारी योजनांचाही लाभ रुग्णांना मिळत नाही. बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या नावाखाली रुग्णांना लुटण्याचे काम केले जात आहे.
हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत होणारा गैरव्यवहार लक्षात घेता हॉस्पिलच्या प्रत्येक व्यहाराची चौकशी व्हावी. मागील दोन वर्षात हॉस्पिटलमध्ये झालेल्या मृत्यूंची चौकशी करावी. याबाबत जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासनाकडे, इंडिएन मेडिकल असोसिएशनकडे तक्रार केली आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत होणारा गैरव्यवहार लक्षात घेता हॉस्पिलच्या प्रत्येक व्यहाराची चौकशी व्हावी. आवाजवी बिल वसूल केल्याबाबत सखोल चौकशी करुन उचित कारवाई करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.