महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर प्रशासनाला जाग कधी येणार ..?
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवर अली शेख :
पिंपरी चिंचवड दि ३ डिसेंबर कासारवाडी हाईवे वर पुण्या कडे जाणाऱ्या दिशेला बीआरटी बस स्थानकात पहाटे सहा वाजता अंधार पसरलेला होता लाईट बंद करून वाचमेन गेला आहे असे तेथील बस स्थानक का मधून एक प्रवासी म्हणाला ,पहाटे दाट धुके पावसाळी वातावरण आणी त्यात बस स्टॉप वर अंधार कॉलेज ला जाणाऱ्या मुली व ऑफिस ला जाणाऱ्या महिलांना त्या वेळी अंधारात बस स्टॉप वर बस ची वाट पाहत उभे राहावे लागते, जर अशा परस्तीतीत तिथे काही गैर प्रकार घडला तर त्याला जवाबदार कौन ? बीआरटी मधे वाचमन,गार्ड पुरवणारी संस्था,अथवा पीएमपीएल वाहतूक व्यवस्था, की पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.पहाटे निगडी ते कासारवाडी पर्यंत चे बीआरटी चे सर्व बस स्टॉप अंधारात असतात पिंपरी चिंचवड सारख्या प्रगतीशिल शहरात जर सू सज्ज बीआरटी बस स्टॉप अंधारात गुडूप आहे हे पिंपरी चिंचवडकरांचे दुर्भाग्य-च म्हणावे लागेल,
संबधित विभागाने तत्परतेने काळजी घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे, हल्ली रोज रस्त्यावर चोरी,मोबाईल हिसकावून घेणे,महिलांची छेड काढने, ह्या प्रकारचे अनेक गुन्हे घडत असताना जर बीआरटी बस स्टॉप अंधारात गुडूप असतील तर महीलांचा सुरक्षा चा प्रश्न निर्माण होत आहे , बीआरटी बस स्टॉप अंधारात आहे आणि ह्या कडे दुर्लक्ष करणे हे पिंपरी चिंचवड मधील प्रवासी महिलांवर अन्यायाचा-च एक भाग म्हणून म्हणावे लागेल,ज्या ज्या ठिकाणी बस स्टॉप वर कासारवाडी,नासिक फाटा खराड वाडी,पिंपरी,मोर वाडी, अंपायर स्टेट,चिंचवड ,आकुर्डी, येथील बीआरटी स्टॉप वर नेमलेल्या गार्ड वर कारवाई करण्यात यावी व सर्व बस स्टॉप वर सकाळी साडे सात वाजेपर्यंत लाईट चालू ठवण्यासाठी आदेश देण्यात यावे अशी मागणी नागरकांमधून होत आहे,
*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*