पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक शाखेनं कारवाई करत लॉजमध्ये सुरू असलेल्या देह विक्रीच्या व्यवसायाचा केला पर्दाफाश
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड देहुरोड परिसरामधील मुंबई बुंगळुरू महामार्गावर असलेल्या हॉटेल द्वारका लॉजिंग मध्ये देहविक्रीचं रॅकेट सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक शोखेला मिळाली पोलिसांनी तत्परतेने उशीर न करता कारवाई केली, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक शाखेनं कारवाई करत लॉजमध्ये सुरू असलेल्या देह विक्रीच्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी १० महिलांची सुटका केली असुन, एकाला अटक केली आहे. लॉजचा मॅनेजरच महिलांकडून देहविक्री करण्यास भाग पाडत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.मिळालेल्या माहितीच्या आधारावर सामाजिक शाखेच्या ३ पोलीस अधिकाऱ्यांसह १३ इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एजंट ग्राहकांकडून ३ हजार रुपये घ्यायचे आणि देहविक्री करणाऱ्या महिलांना ५०० रुपये द्यायचे. छापेमारी करताना पोलिसांनी लॉजमधून २ मोबाईलसह रोख २५ हजार ७०० रुपये जप्त केले. या प्रकरणात पोलिसांनी मॅनेजर गविरंगा गौडा वय ३८ याला अटक केली आहे. तर सुटका करण्यात आलेल्या महिलांना पुण्यातील एका स्वंयसेवी संस्थेकडे सोपवलं आहे. नंतर या महिलांना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवलं जाणार आहे..
मागील काही दिवसा पूर्वी देह विक्री चे प्रकार घडत आहेत म्हणून त्यावर कारवाही संबधित अर्चना राऊत (महिला उपाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड )यांनी आयुक्त साहेबांची भेट घेतली होती असे सूत्रांकडून माहिती मिळाली,अर्चना राऊत यांनी प्रेस मीडिया शी बोलताना सांगितलं की मी विकास नगर येथील महिलांना वचन दिले होते की रस्त्या वर होणाऱ्या बेकायदेशररित्या देह विक्री ला बंद केल्या शिवाय राहणार नाही, याकामासाठी मला मलिक शेख विद्यार्थी सेना अध्यक्ष म न से देहूरोड यांनी सहकार्य केले,