प्रेस मीडिया वृत्तसेवा :
नवी दिल्ली : भारताचे पहिले सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. आज सकाळी तामिळनाडूत लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते.त्यातून ते प्रवास करत होते.
कोईम्बतूर आणि सुलूर यादरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले होतं. हेलिकॉप्टरमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते अशी माहिती आहे. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत देखील हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत देखील होत्या. त्यांचही या अपघातात निधन झालं.हेलिकॉप्टरमधून 14 जण प्रवास करत होते. या अपघतात सर्व 14 जणांचा मृत्यू झाला. बिपीन रावत यांच्या मृत्यूला वायू दलाने दुजोरा दिला आहे. या संदर्भात वायू दलाच्या वतीने ट्विट करण्यात आलं आहे.