2021 मध्ये.. या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप....
मुंबई : 2020 मध्ये इरफान खान, सुशांत सिंह राजपूत, ऋषी कपूर असे कलाकार गमावल्यानंतर 2021 मध्ये ही बॉलिवूडला मोठे धक्के बसले . दिलीप कुमार, सिद्धार्थ शुक्ला, पुनीथ राजकुमार अशा प्रसिद्ध अभिनेत्यांच्या निधनाने बॉलिवूडची मोठीहाणी झाली आहे.दिलीप कुमार यांचे खरं नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पेशावरमध्ये झाला होता. दिलीप कुमार बॉलिवूडचे पहिले खान समजले जातात.
सिद्धार्थ शुक्ला - बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देश हादरला. 2 सप्टेंबर रोजी सिद्धार्थचे हृदविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन झाले. तो अवघा 40 वर्षांचा होता.
पुनीथ राजकुमार - कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीथ राजकुमार याचे 29 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुनीथचा मृत्यूने त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला. हजारो चाहत्यांनी त्याच्या अंत्यविधीला गर्दी केली होती.
सुरेखा सिक्री - बालिका वधू मालिकेतील दादिसा म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 2020 मध्ये त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. तेव्हापासून त्या आजारी होत्या.
राज कौशल - प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे 30 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंदिराने स्वत: तिच्या पतीचे अंत्यसंस्कार केले.
बिक्रमजीत कनवारपाल - अनेक मालिका व चित्रपटांमध्ये झळकलेले प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कनवारपाल यांचे 1 मे रोजी कोरोनाने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. पेज 3, प्रेम रतन धन पायो, चान्स पे डान्स, 2 स्टेट्स, गाझी अॅटॅक, हिरोईन अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे.
अमित मिस्त्री - क्या केहना, एक चालिस की आखरी लोकल, यमला पगला दिवाना अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता अमित मिस्त्री याचे 23 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
राजीव कपूर - बॉलिवूड अभिनेते व दिग्दर्शक राजीव कपूर यांचे 9 फेब्रुवारी रोजी वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. राजीव हे राज कूपर यांचे धाकटे पुत्र तर रणधीर कपूर यांचे लहान भाऊ.