पुणे जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळवून खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ तालुक्यातील विकास कामांचा सपाटा सुरूच

रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना खा. बारणे यांनी दिल्या


प्रेस मीडिया वृत्तसेवा : मावळ प्रतिनिधी : 

 खासदार निधी बंद झाला असतानाही पुणे जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळवून खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ तालुक्यातील विकास कामांचा सपाटा सुरूच ठेवला आहे.आंदर मावळातील चांदखेड, आढले बु, ओवाळे या गावांमधील रस्त्याच्या कामाचे खासदार बारणे यांच्या हस्ते शनिवारी (दि.11) भूमीपूजन झाले. यावेळी रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना खा. बारणे यांनी दिल्या.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, चंद्रकांत भोते, मुन्ना मोरे, राम सावंत, पोपट राक्षे यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, कोरोनाच्या कालावधीत केंद्र सरकारने खासदार निधी बंद केला. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामांवर परिणाम होत होता. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने खासदारांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला. मला पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्या निधीतून मावळातील रस्त्यांच्या कामाची सुरुवात झाली. केंद्र सरकारने निधी बंद केला तरी विकास कामांवर कोणताही परिणाम होऊ दिला जाणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे.

पुणे जिल्हा नियोजन समितीतून आपल्या मतदारसंघासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यातील आंदर मावळातील रस्त्यांच्या कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून तीन गावांच्या रस्त्यांचे भूमीपूजन झाले. रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे. रस्ता नागरिकांसाठी लवकरात-लवकर सुरु करावा अशा सूचना त्यांनी दिल्या. मावळ तालुक्यात यापूर्वीही सर्वाधिक निधी दिल्याचे खासदार बारणे यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post