कोल्हापूर जिल्ह्यातील ९ नगरपरिषदेवर प्रशासक..

 पुणे जिल्ह्यातील १०, सातारा जिल्ह्यातील ८, सांगली जिल्ह्यातील ५, सोलापूर जिल्ह्यातील ९, कोल्हापूर जिल्ह्यातील ९ नगर परिषदेचा समावेश आहे. नगरविकास २चे प्रधान सचिव महेश पाठक यांनी हा आदेश पारित केला.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :


मुख्याधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक....

कोल्हापूर : डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ मध्ये पुणे विभागातील मुदत संपलेल्या ४२ नगरपरिषदेवर संबंधित मुख्याधिकारी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचा शासन आदेश संबंधित पालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या मध्ये पुणे जिल्ह्यातील १०, सातारा जिल्ह्यातील ८, सांगली जिल्ह्यातील ५, सोलापूर जिल्ह्यातील ९, कोल्हापूर जिल्ह्यातील ९ नगर परिषदेचा समावेश आहे. नगरविकास २चे प्रधान सचिव महेश पाठक यांनी हा आदेश पारित केला असून कोविड १९ च्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणुका वेळेवर पार पाडणे अशक्य असल्याने व स्थानिक संस्थांच्या निवडणुक प्रक्रिया पार पाडण्याकरिता अवधी असल्याचे निवडणूक आयोगाने कळविल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमातील तरतुदी केलेल्या कलम ३१७ (३) प्रशासकाची नेमणूक करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका

इचलकरंजी नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी, जयसिंगपूर नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी, गडहिंग्लज नगरपरिषद उपविभागीय अधिकारी, कागल नगरपरिषद तहसीलदार, कुरुंदवाड नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी, मलकापूर नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी, मुरगूड नगरपरिषद उपविभागीय अधिकारी, पन्हाळा नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी, वडगाव नगरपरिषद उपविभागीय अधिकारी, शासन नियुक्त प्रशासकांनी (दि.२९) डिसेबर २०२१ पासून कार्यभार सांभाळायचा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post