बँकेचे व्याज दर कमी करुन वरिष्ठ नागरिकांचे होते ते उत्पन्न कमी करत आहेत.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
भारतात ७० वर्षे वयानंतर वरिष्ठ नागरिक वैद्यकीय विम्यासाठी पात्र नाहीत त्यांना ई एम आय वर कर्ज मिळत नाही. ड्रायव्हिंग लायसन्स दिले जात नाही. त्यांना आर्थिक कामकाजासाठी कोणत्याही नोकऱ्या दिल्या जात नाहीत. त्या मुळे ते दुसऱ्यावर अवलंबून राहतात.
तरुणपणी त्यानी सर्व कर भरलेले असतात . आता वरिष्ठ नागरिक झाल्यावरही त्यांना सर्व कर भरावे लागतात. भारतात वरिष्ठ नागरिकांसाठी कुठल्याही योजना नाहीत. वरिष्ठ नागरिकांच्या जीवनात कुठलाही त्रास होऊ नये अशी काळजी घेतली जात नाही. वारे न्याय ..? अपरिवर्तनीय योजनांवर सरकार बरीचशी रक्कम खर्च करते, परंतु कधीही वरिष्ठ नागरिकांसाठी योजना आवश्यक आहे असे सरकारला वाटत नाही. उलट बँकेचे व्याज दर कमी करुन वरिष्ठ नागरिकांचे होते ते उत्पन्न कमी करत आहे. भारतीय वरिष्ठ नागरिक होणे म्हणजे गुन्हा आहे असे वाटते...