तळेगाव दाभाडे नाणोली बैलगाडा शर्यतीचे आयोजनास

  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थागती.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

मावळ प्रतिनिधी : पठाण एम एस

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जारी केलेल्या निर्बंधांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या विनंतीनुसार  बैलगाडा  शर्यत स्थगित करण्यात आल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. 

अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन होत असल्याने बैलगाडा मालक व शौकिनांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते, तथापि ऐनवेळी शर्यत रद्द झाल्यामुळे त्यांचा हिरेमोड झाला.

सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत आज शनिवारी (एक जानेवारी) तळेगाव दाभाडे एमआयडीसीजवळ नाणोली तर्फे चाकण येथे होणार होती. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडा शर्यतीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सशर्त परवानगी दिली होती. त्यामुळे नाणोलीच्या दत्त जयंती उत्सवात तब्बल आठ वर्षांनी बैलगाडे धावणार होती.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क : 

मावळ प्रतिनिधी पठाण एम एस 94232 49331*

Post a Comment

Previous Post Next Post