वक्फ बोर्डाची धडक कारवाई,

 मशिदीचे साडेआठ एकर जमिनीचा घेतला ताबा

        वक्फ बोर्ड अॕक्शन मोड मध्ये



प्रेस मीडिया वृत्त सेवा 

 मावळ प्रतिनधी : पठाण एम एस

वक्फ बोर्ड अॕक्शन मोड मध्ये आल्यावर औरंगाबाद जिल्ह्यातील शेकट्या जवळील मशिदीच्या साडेआठ एकर जमिनीचा वक्फ मंडळा तर्फे ताबा घेण्यात आला.अशी माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनिस शेख यांनी दिली.

 राज्यातील वक्फ जमिनीचा खालसा करून खरेदी-विक्री करणे,वक्फ जमिनींचा गैरव्यवहार व अवैधरित्या ताबा करणे अश्या गैरकृत्य करणाऱ्या विरोधात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळा तर्फे धडक कारवाई करण्यात येत आहे.अश्याच एका प्रकरणात औरंगाबाद जिल्ह्यातील शेकट्या जवळील मशिदीच्या साडेआठ एकर जमिनीचा वक्फ मंडळा तर्फे ताबा घेण्यात आला. या बाबत सविस्तर वृत्त असे की,मशीद रांजणगाव खुरी मौजे शेकत बिडकीन ता..पैठण येथील सर्व्हिस इनामी जमीन गट न.१२० एकूण ८ एकर३९ गुंठे आहे.या जमिनीवर गेल्या अनेक वर्ष पासून सूर्यभान पवार,किशोर बद्री भवार, विष्णू श्रीपती भवार, बरकू श्रीपती भवार,बरिगाबाई भवार,शिवाजी भवार व अशोक बर्वे रा. सर्व शेकटा,यांनी अनधिकृतपणे ताबा केला होता.त्या विरुद्ध मशिदीचे मुतवल्ली शेख नासिर व इतर यांनी वक्फ अधिनियम १९९५ चे कलाम ५४ अन्वये वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे सदरचे अतिक्रमण निष्कसित बाबत प्रकरण दाखल केले होते.सदर प्रकरणी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सुनावणी घेऊन दि.३०-१०-२००६ रोजी निर्णय दिला की सादर जमीन ही रंजन खुरी येथील मशीदची इनाम आहे.सर्व अतिक्रमण धारकांनी जमिनी वरील अतिक्रमण हटवून *मशिदीचे मुतवल्ली शेख नासिर* व इतर यांच्या कडे ताबा द्यावा.सदरच्या आदेशाला सूर्यभान भवार मयत यांचे वारसदार सुखदेव भवार व इतर यांनी औरंगाबाद येथील वक्फ न्यायाधिकरण येथे क्र.७४/२००६ दाखल केला.या प्रकरणी वक्फ न्यायधिकारणाने मुख्यकार्यकरी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशास दि.२०-१०-२००९ रोजी बरोबर असल्याचा निकालात म्हटले व संबंधितांचा दावा फेटाळला.नाराजीने सदरील लोकांनी मुंबई उचन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने सिव्हिल रिविजन याचिका क्र.२५५/१३ च्या प्रकरणाची सुनावणी करून २६-०४-२०१६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेश कायम ठेवले.तसेच २०१८ साली मुतवल्ली तर्फे उचन्यायलयात कंटेम्प याचिका दाखल केली त्या अनुषंगाने महसूल विभागास कारवाई करण्यास बजावले.वक्फ मंडळ कडून आज ३१-१२-२०२१ रोजी सदर जागेचा ताबा मंडळ अधिकारी,लोहगाव,तलाठी,पोलीस यांच्या मदतीने वक्फ मंडळाचे *जिल्हा वक्फ अधिकारी सय्यद फैज* यांनी अतिक्रमण निष्कसित करून ताबा घेतला.सदर जमीन आज रोजी मशिदीचे मुतवल्ली इनामदार शेख नासिर यांच्या कडे ताबाही देण्यात आला.या वेळी मंडळ अधिकारी कर्मचारी व पोलिसांनी सहकार्य केले


*जाहिरात व बातम्या साठी संपर्क :

 पठाण एम एस 9423249331*

Post a Comment

Previous Post Next Post